मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त

मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त

आरोग्यनामा ऑनलाइन – प्राणी हे पाळीव असोत की जंगली, ते कधीही निसर्गाचे नियम मोडत नाहीत. त्यांचे जीवन निसर्गाशी एकरूप असते. म्हणूनच त्यांचे आरोग्य उत्तम रहाते. या प्राण्यांच्या जीवनक्रमाकडे लक्षपूर्वक पाहिल्यास खूप काही शिकायला मिळू शकते. उलट मनुष्य चुकीची कामे करून आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण करत असतो. प्राण्यांपासून कोणत्या गोष्टी शिकता येऊ शकतात, याविषयी जाणून घेवूयात.

मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त

१ व्यायाम

कुत्रे किंवा मांजरी हे सकाळी उठल्यावर स्ट्रेचिंग करतात. यामुळे त्यांच्या मसल्स निरोगी राहतात. पशु-पक्षी दिवसभर चालतात किंवा उडत असतात. हा त्यांचा नैसर्गिक व्यायाम त्यांना निरोगी ठेवतो. अपण सुद्धा सकाळी उठून स्ट्रेचिंग केले पाहिजे. जास्तीत जास्त चालले पाहिजे. दिवसभर शारीरीक हालचाली केल्या पाहिजेत.

Related image

२ तणाव

प्राणी कधीही तणावात नसतात. ते आयुष्य आनंदात जगतात. आपणही छोट्या-छोट्या गोष्टींचे टेन्शन घेऊ नये. यामुळे शरीराचे रक्ताभिसरण बिघडते. हृदयरोग आणि मधुमेहासारखे आजार होतात.

मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त

३ कच्चे खाणे

प्राणी त्यांचे अन्न कच्चे खातात. तसेच साठवूनही ठेवत नाहीत. अन्नामध्ये दुसरे कोणतेही पदार्थ मिसळत नाहीत. माणसानेही आहारात जास्तीत जास्त कच्च्या पदार्थांचा समावेश करावा. फळे, भाज्या, सलाद, कंद-मुळ आणि सुकामेवा याचा समावेश करावा.

Related image
४ निसर्ग प्रेम
प्राणी निसर्गात राहतात. त्यांना शुद्ध हवा आणि पाणी मिळते. म्हणून ते दीर्घकाळ निरोगी राहतात. माणसांनीही निसर्गरम्य ठिकाणी जास्त काळ घालवला पाहिजे. यासाठी घराच्या खिडक्या उघड्या ठेवून झोपावे. यामुळे दमा, टी.बी., सायनोसायटिससारख्या आजारांपासून बचाव होईल.

आरोग्यविषयक वृत्त

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु