‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

‘मेंदू’ आणखी तल्लख करण्यासाठी ‘हे’ उपाय आहेत फायदेशिर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : मेंदूची कार्यक्षमता ही अनेक उपाय करून वाढवता येऊ शकते. ज्या कामामध्ये मेंदूचा वापर जास्त होतो ती कामे जास्त प्रमाणात दिनचर्येत समाविष्ठ केल्यास नवीन ब्रेन सेल्स वेगाने विकसित होतात. यामुळे मेंदू अधिक तल्लख होतो. इंटरनेट सर्फिंग करताना मेंदूच्या पेशी व्यग्र होतात आणि निर्णयक्षमता व कॉम्प्लेक्स रिझनिंगला नियंत्रित करतात. सर्फिंग करताना वापरकर्ता न्यूरल सर्किट्रीचा वापर करत असल्याचे यूसीएलएच्या संशोधकांना आढळून आले आहे.

परंतु, असे पुस्तक वाचताना होत नाही. मेंदू जास्त तल्लख असल्यास त्याचा फायदा जीवनात अनेक प्रकारे होऊ शकतो. विशेष म्हणजे तल्लख मेंदू मुळे तुम्ही एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यशस्वी होऊ शकता. बुद्धमत्तेत झालेली वाढ ही तुमच्या जीवनावर खुप मोठा प्रभाव टाकणारी असते. त्यामुळे मेंदुची तल्लखता खुप महत्वाची आहे. यासाठीच अनेकजण विविध प्रकारचे घरगुती उपाय, औषधे घेत असता. परंतु, शास्त्रज्ञांनी सुचित केल्याप्रमाणे जर विशिष्ट कामे जाणीवपूर्वक केल्यास मेंदुची कार्यक्षमत वाढू शकते. नियमित ध्यानधारणा केल्याने तणाव तर कमी होतो. तसेच यामुळे मेंदूची कार्यक्षमताही वाढते. बोस्टन येथील मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलच्या एका संशोधनानुसार ध्यानधारणा केल्याने मेंदूच्या कॉर्टेक्स नावाच्या भागाची सक्रियता वाढते. हा भाग स्मरणशक्ती आणि नव्या गोष्टी शिकण्यासाठी व्यक्तीची मदत करतो.

ओरल आणि ब्रेन हेल्थचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. २० ते ५९ वर्षे वयाच्या सुमारे एक हजार लोकांचे संशोधन केले असता ज्या लोकांना दात आणि हिरड्यांशी संबंधित त्रास होता त्यांची आकलन शक्तीदेखील खूप कमकुवत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे वर्षातून एक-दोन वेळा दंत चिकित्सकांकडून तपासणी करणे महत्वाचे ठरते. याचाच अर्थ मेंदुच्या तल्लखतेसाठी दातांचेही आरोग्य चांगले ठेवणे महत्वाचे ठरते, असेच या प्रयोगातून समोर आले आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु