‘ही’ ८ लक्षणे आहेत ल्यूकेमियाची, दुर्लक्ष करणे ठरु शकते जीवघेणे

‘ही’ ८ लक्षणे आहेत ल्यूकेमियाची, दुर्लक्ष करणे ठरु शकते जीवघेणे

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – ल्यूकेमिया हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर असून या आजारात रक्तातील पांढऱ्या पेशींवर परिणाम होतो. मात्र, ल्यूकेमियाच्या लक्षणे वेळीच ओळखता आली तर तर या आजारावर काही उपचार करता येऊ शकतात. अन्यथा हा आजार जीवघेणाही ठरतो. दरवर्षी सुमारे १० लाख लोकांना ल्यूकेमिया हा आजार होतो. ल्यूकेमिया कोणत्या प्रकारचा आहे, हे कॅन्सरचं रूप घेणाऱ्या रक्तपेशींच्या प्रकारावर अवलंबून असत. म्हणूच या आजाराची लक्षणे ओळखता येणे खूप महत्वाचे ठरते. ही लक्षणे जाणून घेतल्यास वेळीच सावध होणे शक्य आहे.

ल्यूकेमियाचे पाहिले लक्षण म्हणजे हिरड्यांमध्ये सूज येणे होय. नेहमीच तोंडाची व्यवस्थित स्वच्छता न केल्याने हा त्रास होत असला तरी हे ल्यूकेमियाचे सुद्धा लक्षण आहे. सतत हिरड्यांमध्ये सूज होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. ताप येणे हेदखील या आजाराचे लक्षण आहे. हा आजार झाल्याने शरीराची इम्यून सिस्टीम कमजोर होऊ लागते. त्यामुळे ताप येणे, सर्दी-खोकला होणे या समस्या सतत जाणवतात. शिवाय, श्वास घेण्यास त्रास होतो. अधिक थकवा आणि कमजोरीमुळे शरीरावर आध्यात्मिक प्रेशर पडते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. व्यक्ती लवकर लवकर श्वास घेऊ लागतो. थोड्या पायऱ्या चढल्यातरी दम लागतो.

जर स्पलीनची साइज वाढली तर हे क्रॉनिक किंवा एक्यूट ल्यूकेमियाच लक्षण असू शकते. स्पलीनची साइज वाढल्याने भूक सुद्धा कमी लागते. तसेच थकवा जाणवत असेल किंवा झोप पूर्ण झाल्यावरही शरीरात कमजोर वाटत असेल, उठता येत नसेल, तर हे ल्यूकेमियाचे लक्षणे आहे. असे लक्षण आढळल्यास दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात. थकवा आणि कमजोरी तेव्हाच जाणवते जेव्हा तुमच्या शरीरात रक्त कमी होते. रक्ताची कमतरता होण्याला अनीमिया असेही म्हटले जाते. कोणतीही दुखापत न होता जखम होणे किंवा शरीराच्या एखाद्या भागावर काळे किंवा निळे डाग पडल्यास डॉक्टरांकडे जावे. जखम भरण्यास अधिक वेळ लागत असेल तर हे ल्यकेमियाचे लक्षण असू शकते. तसेच सतत डोकेदुखी होणे हे सुद्धा न्यूकेमियाचे लक्षण असू शकते. डोक्यात ब्लीडिंग सुद्धा या आजारामुळे होऊ शतके. जर रात्री झोपताना अचानक घाम येत असेल तर हे गंभीर लक्षण आहे. अचानक घाम येणे सामान्य बाब नाही. याचा थेट संबंध ल्यूकेमियाशी असू शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु