फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी करा ‘हे’ ५ नैसर्गिक उपाय

फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी करा ‘हे’ ५ नैसर्गिक उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रदुषण आणि सिगारेटसारख्या व्यसनांमुळे फुफ्फुसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सतत अशा प्रदुषित वातावरणात राहिल्याने फुफ्फुसांचे अनेक जीवघेणे आजार होतात. परंतु, अशा दुषित हवेपासून वाचणेसुद्धा जवळपास अशक्य आहे. कारण कामानिमित्त प्रत्येकाला बाहेर जावेच लागते. तरीही आपण असे कही उपाय करू शकतो, ज्यामुळे फुफ्फुसे काही प्रमाणात स्वच्छ राहू शकतात.

वाफ घेणे
फुफ्फुसांना स्वच्छ करण्यासाठी वाफ घेणे हा सर्वात चांगला उपाय आहे. वाफ श्वासाबरोबर आत घेतल्यास श्वासनलिका उघडते आणि आतील कफ बाहेर काढण्यास फुफ्फुसांना मदत होते. थंडीत हवेचा जोर जसा कमी होतो त्यानुसार प्रदुषण वाढत जाते. धुर आणि धुके जमिनीवर साठल्याने यातून धूळ तयार होते आणि प्रदुषणाचा स्तर वाढतो.

मध सेवन करा
मधामध्ये अँटीऑक्सीडेंट्स, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लामेटरी गुण असतात. यामुळे फुफ्फुसाचे कप्पे स्वच्छ होण्यास मदत होते. एक चमचा मध फुफ्फुसांसाठी लाभदायक ठरू शकते.

ग्रीन-टी
ग्रीन-टी फुफ्फुसांच्या स्वच्छतेसाठी खुप उपयोगी आहे. ग्रीन-टीमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट्स असतात. तसेच फुफ्फुसांमध्ये इंफ्लामेशनला कमी करण्याचे कामही ग्रीन टी करते. ग्रीन-टीमधील इतर घटक धुरामुळे फुफ्फुसाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात.

खोकला दाबू नका
प्रदुषणामुळे सुखा खोकला येणे ही सामान्य गोष्ट आहे. खोकल्याने आपल्या शरीरातील धुळीचे कण आणि कफ बाहेर पडतो. यामुळे खोकला आला तर तो थांबवू नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु