असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’

 
असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – एड्स हा असा रोग आहे ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू संभवतो. एड्स कोणत्याही वयात होऊ शकतो. एड्स हा व्यक्तिचं संपूर्ण शरीर हळूहळू निकामी करतो. महत्वाचं म्हणजे या रोगावर अजून कोणत्याही देशात औषध सापडलेलं नाही. पण खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की एड्स कसा आणि कधी होतो. एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो. असे सर्वांना वाटते. पण हा तुमचा गैरसमज आहे. कारण एड्सचे संक्रमण होण्याची अनेक कारणे आहेत.

१) ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तीचं रक्त जर तुमच्या शरीरात गेलं तरी तो होऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो.

२) एड्सचा व्हायरस शरीरात गेल्यानंतर संपूर्ण शरीरात पोहचण्यासाठी त्याला 10 वर्ष लागतात. हा व्हायरस आणखी कमी दिवसांमध्ये पण शरीरात पसरू शकतो. वयानुसार तो शरीरात पसरतो.

३) निरुत्साही आणि सारखं थकल्या सारखं वाटणे, शरीरात दुखणं, उलटी होणं ही एड्सची प्राथमिक लक्षणे आहेत. अशा प्रकारे जर त्रास होत असेल तर लगेचच रुग्णालयात जाऊन त्याची तपासणी केली पाहिजे.

४) भराभर मोठ्या प्रमाणावर वजन घटणे, सुका खोकला, सतत ताप येणे, जांघ, काख, दीर्घ कालावधीसाठी गंभीर स्वरूपाचा कॉलरा, फुफ्फुसांची जळजळ, त्वचेच्या खाली, तोंड, पापण्यांच्या खाली, किंवा नाकामध्ये लालसर, तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे डाग, निरंतर विसराळूपणा ही या आजाराची लक्षणे आहेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु