नपुंसकता दूर करण्यासाठी खा फुटाणे, ‘या’ आजारांवरही आहे रामबाण औषध ; जाणून घ्या

नपुंसकता दूर करण्यासाठी खा फुटाणे, ‘या’ आजारांवरही आहे रामबाण औषध ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पूर्वी फुटाणे, वाटाणे, खारे शेंगदाणे खाण्याचे प्रमाण जास्त होते. परंतु, आता फास्ट फूड आणि जंक फूडमुळे हे खाणे कालबाह्य होऊ लागले आहे. अतिशय पौष्टीक असलेले हे खाणे सध्याच्या काही लहान मुलांना माहितही नाही. आयुर्वेदातही फुटाणे पौष्टिक असल्याचे सांगितले आहे. फुटाणे खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. यामध्ये मोठमोठ्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. याच्या नियमित सेवनाने सौंदर्य खुलते, स्मरणशक्ती वाढते, नपुंसकता दूर होते. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.

असे खा फुटाणे

लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज नाष्ट्यामध्ये फुटाणे खा. अंकुरित हरभरे तीन वर्ष नियमित खाल्ल्यास कुष्ट रोगामध्ये आराम मिळतो.

गर्भवतीला उलट्या होत असतील तर भाजलेल्या फुटण्याचे सूप पाजावे.

चनाडाळीच्या पिठाचा हलवा थोडे दिवस नियमित खाल्यास वाताच्या आजारांमध्ये तसेच दम्याच्या त्रासामध्ये आराम मिळतो.

पंचवीस ग्रॅम काळे फुटाणे रात्री भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास मधुमेही रुग्णाला आराम मिळेल.

रात्री हरभरा डाळ भिजवून ठेवा. सकाळी ही डाळ बारीक वाटून घ्यावी आणि साखरेच्या पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. मानसिक तणाव कमी होतो.

भाजलेले फुटाणे रात्री चावून खावेत आणि त्यानंतर गरम दुध प्यावे. या उपायाने श्वसानाशी संबधित रोग तसेच कफ दूर होतो.

कावीळीत शंभर ग्रॅम हरभरा डाळ दोन ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर डाळ पाण्यातून काढून १०० ग्रॅम गुळ मिसळून ४-५ दिवस सेवन करावे.

पंचवीस ते तीस ग्रॅम फुटण्यामध्ये १० ग्रॅम त्रिफळा चूर्ण मिसळून घ्या. फुटाणे थोडा वेळ भिजवून ठेवा. त्यानंतर एका कपड्यात बांधून अंकुरित करून घ्या. सकाळी नाष्ट्यामध्ये हे फुटाणे खाल्ल्यास पोटाचे आजार दूर होतात. रक्त वाढते.

चीनी मातीच्या भांड्यात रात्री फुटाणे भिजवून ठेवा. सकाळी हे फुटाणे चावून-चावून खाल्ल्याने विर्यवृद्धी होते. तसेच नपुंसकता नष्ट होते.

१० भिजवलेले हरभरे खाल्ल्यानंतर दूध प्यावे. या उपायाने वीर्यातील पातळपणा कमी होतो.

११ फुटाणे पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर फुटाणे बाजूला काढून ते पाणी प्या. मध मिसळून हे पाणी पिल्यास कमजोरी आणि नपुंसकतेची समस्या दूर होते.

१२ दहा ग्रॅम हरभरा डाळ भिजवलेली आणि दहा ग्रॅम साखर मिसळून या मिश्रणाचे ४० दिवस सेवन केल्यास पुरुषांमधील कमजोरी दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु