महिलांनी गरोदरपणात व्यायाम केल्याने होतील ‘हे’ खास फायदे

महिलांनी गरोदरपणात व्यायाम केल्याने होतील ‘हे’ खास फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गरोदरपणात व्यायाम करणे आरोग्य आणि मुलासाठी चांगले नसते, गैरसमज काही गरोदर महिलांना असतो. परंतु, गरोदरपणात व्यायाम करणे आई आणि बाळासाठी फायदेशीर ठरते, असा सल्ला डॉक्टर देतात. गरोदर महिलांनी नियमित योग्य तो व्यायाम केल्यास होर्मोन्स आणि उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. शिवाय, प्रसव वेदनांसाठी महिला सज्ज राहते. अशा महिलांनी व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गरोदरपणातील व्यायामाचे फायदे

* गरोदरपणातील अखेरच्या तीन महिन्यांमध्ये झोप न येण्याची समस्या जाणवते. व्यायाम केल्याने ही समस्या दूर ठेवता येते. परंतु, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योग्य व्यायाम करावा.

* बाळंतपणानंतर बहुतांश महिलांना शरीराचा पूर्वीसारखा आकार हवा असतो. जर महिलांनी गरदोरपणात आणि मूल जन्मल्यानंतरही नियमितपणे व्यायाम केला तर त्यांना वजन कमी करणे सोपे जाते, असे डॉक्टर सांगतात.

* या काळात शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असल्याने मूड वारंवार बदलतो. नियमितपणे व्यायाम केल्यास ही समस्याही दूर होते. व्यायामामुळे हार्मोन्स संतुलित राहतात आणि आत्मविश्वासही वाढतो.

* गरोदरपणात व्यायाम केल्याने मेंदू आणि शरीर प्रसव वेदनांसाठी तयार होते. संशोधनाअंती व्यायामामुळे लेबर आणि डिलिव्हरीची वेळ कमी होते. व्यायामामुळे डिलिव्हरीही लवकर होते.

* गरोदरपणात २० मिनिटांचा व्यायाम आठवड्यातून तीन वेळा केल्याने बाळाच्या मेंदूची क्षमता वाढते, असे मॉन्ट्रीयाल विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे.

* गरोदरपणात पाठदुखीचा त्रास बुतांश महिलांना होतो. मात्र, व्यायाम केल्याने ही समस्या कमी होते. फक्त व्यायाम करताना पाठीवर झोपू नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु