सर्व वयोगटासाठी विविध आजारांवर ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय

सर्व वयोगटासाठी विविध आजारांवर ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या घरातील अनेक पदार्थांमध्ये औषधी गुण असतात. परंतु, हे गुण आपल्याला माहित नसल्याने आपण त्यांचा वापर करू शकत नाही. याची माहिती घेतल्यास अनेक आजारांवर उपचार करता येऊ शकतात. अशाच काही उपयोगात येणाऱ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हे घरगुती उपाय करून विविध आजारातून मुक्त होता येणे शक्य आहे.

हे उपाय करा

* लिंबूमध्ये पोटॅशियम आढळते. हा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.

* डोळ्यात जळजळ होत असल्यास एक स्वच्छ कापड कोरफडीच्या रसात बुडवून त्याने डोळे पुसून घ्या.

* पोटात काही समस्या निर्माण झाल्यास चार-पाच पाने कढीपत्ता वाटून ताकात मिसळा. रिकाम्यापोटी हे ताक प्यावे लगेच आराम मिळतो.

* देशी गुलाबाच्या ९-१० पाकळ्या एक ग्लास पाण्यात काही तासांसाठी भिजवून ठेवा. या पाण्याने नियमितपणे डोळे धुतल्याने थकवा दूर होतो.

* रक्तदाबाचा त्रास होत असल्यास काही बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याच्या साली काढून ते एक ग्लास दुधात उकळून घ्यावे. हे दूध कोमट करून प्या.

* मायग्रेनचा त्रास होत असल्यास पुदिन्याची ताजी पाने पाण्यात उकडून मिंट टी तयार करा. हा चहा पिल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.

* संसर्गामुळे दात दुखत असतील तर लसणाच्या दोन-तीन कच्च्या पाकळ्या चावून खा. यामुळे संसर्ग दूर होईल आणि वेदनाही कमी होतील.

* पोटात गॅस होत असेल तर एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा हळद आणि चिमूटभर सैंधव मिसळून सेवन करा. यामुळे गॅस राहणार नाही.

* सोप साखरेसोबत वाटून घ्या. झोपताना सुमारे ५ ग्रॅम चूर्ण हलक्या कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे पोटाच्या समस्या व मलावरोध राहणार नाही.

* चक्कर येत असल्यास अर्धा ग्लास पाण्यात दोन लवंग टाकून ते उकळा. नंतर हे पाणी थंड करून प्यावे, आराम मिळतो.

* कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्याने फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु