‘या’ ८ गोष्टींमुळे भंग होते एकाग्रता, जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी

‘या’ ८ गोष्टींमुळे भंग होते एकाग्रता, जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एकाग्रता चांगली असल्याशिवाय आपण कोणतेही काम व्यवस्थित पार पाडू शकत नाही. एकाग्रता भंग होण्याची अनेक कारणे आहेत. एकाग्रता भंग करत असलेल्या विविध गोष्टींकडे आपण अजाणतेपणे दुर्लक्ष करत असतो. कोणत्या गोष्टी एकाग्रता भंग करतात आणि त्याची कारणे, याबाबत आपण माहिती घेवूयात.

ही आहेत कारणे

१) आजूबाजूची जागा अशांत असणे. कामाच्या ठिकाणी कुणीतरी वारंवार कामामध्ये दखल देत असेल तर एकाग्रता भंग होऊ शकते. तसेच असुविधा हे एकाग्रता भंग होण्याचे कारण असू शकते.

२) बुद्धी चांगल्याप्रकारे सक्रिय राहण्यासाठी चांगला आहार खूप महत्वाचा आहे. एकाग्रतेसाठी रोज सकाळी नाष्टा केलाच पाहिजे. स्वास्थ्यवर्धक आणि पौष्टिक नाष्टा केल्यास मन एकाग्र होते.

३) मल्टी टास्किंग म्हणजेच एकाचवेळी विविध कामे केल्याने एकाग्रता भंग होते. कारण आपण पूर्ण लक्ष एकाच कामावर केंद्रित करू शकत नाहीत. सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर कमी करा.

४) डिप्रेशनने कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. तणावापासून दूर राहण्यासाठी योग आणि इतर उपायांची मदत घेणे आवश्यक आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

५) वारंवार ईमेल चेक करणे, मित्र किंवा कुटुंबातील कॉल व मॅसेजचे उत्तर आणि वारंवार सोशल मिडिया साईटवर अपडेट राहणे, हे एकाग्रता भंग होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवा.

६) आरोग्य समस्या सुद्धा एकाग्रता भंग करू शकते. वेदना किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्येची जाणीव झाल्यास कामावर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता जवळपास अशक्य होते.

७) काही औषधे मानसिक स्तराला नुकसान पोहचवतात. यामुळे शारीरिक आरोग्याचेही नुकसान होऊ शकते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेवू नका.

८) झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. झोपल्यानंतर आपले मस्तिष्क आराम करते. तसेच लक्षात ठेवण्यायोग्य आणि विसरण्यायोग्य गोष्टींना वेगवेगळे करते. पूर्ण झोप घेतली नाही तर पुन्हा काम करताना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु