अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे

अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली इत्यादीमुळे अपचन, कंबरदुखी, नैराश्य येणे आदी समस्या होतात. या सर्व समस्यांवर एकच रामबाण उपाय असून तो म्हणजे सेतूबंधानसन नियमित करणे. यास ब्रिज पोज असेही म्हणतात. या आसनामुळे पोटातील स्नायूंचे कार्य सुधारते आणि पचनक्रिया सुरळीत होते.

हे आहेत फायदे
१ पचनक्रिया सुधारते.
२ बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास दूर होतो.
३ कंबरदुखी दूर होते.
४ नैराश्य दूर होते.
५ थायरॉइडच्या आजारा आराम मिळतो.

असे करा आसन
एका बाजूने वळून पाठीवर विश्राम अवस्थेत झोपा. दोन्ही पाय एकमेकांजवळ आणा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. हाताचे पंजे जमिनीवर ठेवा. दोन्ही पाय गुघड्यांमध्ये वाकवून पाश्र्वभागाजवळ आणण्याचा प्रयत्न करा. नैसर्गिकरित्या श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुरू ठेवत कंबर हळूवारपणे शक्य होईल तेवढी वरच्या दिशेला उचला. क्षमतेनुसार या अंतिम स्थितीत राहा. नंतर कंबर हळूहळू जमिनीवर आणा. पाय जमिनीवर ठेवा. नंतर दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून, दोन्ही हात शरीरापासून थोड्या अंतरावर ठेवा. पुन्हा विश्राम अवस्थेत या. अशी ३ ते ५ आवर्तन करा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु