माणसाच्या पोटात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण जाण्याचे प्रमाण चिंताजनक

माणसाच्या पोटात ‘मायक्रोप्लास्टिक’चे कण जाण्याचे प्रमाण चिंताजनक

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पृथ्वी, पर्यावरण, माणूस, जनावरे, पाणी आणि जमीनीवरील अनेक प्राणी, पक्षी हे प्लास्टिकमुळे बेजार झाले आहेत. प्लास्टिक वेस्टचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. एका अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, दरवर्षी जेवण आणि श्वासांच्या माध्यमातून हजारो मायक्रोप्लास्टिक कण मानसाच्या शरीरात प्रवेश करतात. प्लास्टिक वेस्ट सजीवसृष्टीसाठी शाप ठरत आहे. अनेक उपाययोजना सुरू असूनही प्लास्टिकमुळे निर्माण झालेला धोका अद्याप कमी झालेला नाही.

मायक्रोप्लास्टिक हे प्लास्टिकचे हे सूक्ष्म कण सिथेंटिक कपडे, टायर आणि कॉन्टॅक्ट लेन्स इत्यादींपासून तुटून तयार होतात. मायक्रोप्लास्टिक पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी असलेल्या वस्तूंपैकी एक आहे. हे कण जगातल्या सर्वात उंच ग्लेशिअर्स आणि समुद्राच्या सर्वात खोल तळातही आढळतात. यापूर्वीच्या एका संशोधनात म्हटले आहे की, जवळपास सर्वच प्रमुख बॉटलबंद पाणी ब्रॅन्ड्सच्या नमून्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळते. या संशोधनात असे आढळले की, दरवर्षी एक वयस्क पुरूष ५२ हजार मायक्रोप्लास्टिक कण गिळंकृत करतो.

ज्या प्रदूषित वातावरणात आपण श्वास घेतो, जर त्याचाही यात समावेश करण्यात आला तर ही आकडेवारी वाढून १ लाख २१ हजार कणांपर्यंत पोहोचते. आणखी एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, एखादी व्यक्ती केवळ बॉटलचे पाणी पित असेल तर त्याच्या शरीरात दरवर्षी अतिरिक्त ९० हजार मायक्रोप्लास्टिकचे कण पोहोचू शकतात. ही आकडेवारी केवळ अंदाज असून एखादी व्यक्ती प्लास्टिकचे किती सेवन करते हे ती व्यक्ती कुठे राहते आणि काय खाते यावर अवलंबून आहे. मायक्रोप्लास्टिक कणांचा मनुष्याच्या शरीर आणि आरोग्यावर कोणता परिणाम होतो, याबाबत माहिती उपलब्ध नाही. मात्र, १३० मायक्रोमीटरपेक्षा छोटे मायक्रोप्लास्टिकचे कण व्यक्तीच्या टिशूमध्ये जाऊन इम्यूनिटीला प्रभावित करतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु