‘या’ रोगांवर रामबाण ‘औषध’ आहे मोठी विलायची, जाणून घ्या उपाय

‘या’ रोगांवर रामबाण ‘औषध’ आहे मोठी विलायची, जाणून घ्या उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मसाल्यात मोठ्या विलायचीचा उपयोग केला जातो. विलायची छोटी आणि मोठी अशी दोन प्रकारची असते. छोटी विलायची अनेक गोड पदार्थांमध्ये वापरली जाते. मोठी विलायची मसालेदार, तिखट, चटपटीत पदार्थांत वापरण्यात येते. विलायचीला मराठीत वेलदोडा हिंदीत भूरी विलायची, असेही म्हणतात. विलायचीच्या बीयांचा कापुरसारखा सुगंध येतो.

हे आहेत फायदे

* या विलायचीचे सेवन हे पचनासाठी खूप खुप फायदेशीर आहे. हे खाल्याने पाचकद्रव्य स्त्रावाचे संतुलन सुरळीत राहते. अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होतो. अल्सर आणि पचनक्रियेचे आजार कमी होतात.

* मोठी विलायची दमा आणि श्वाससंबंधीत आजारांसाठी उपयोगी आहे. ही विलायची नियमित खाल्ल्याने दमा, खोकला, फुफ्फुसांचे आकुंचन, फुफ्फुसांवरील सुज अशा अनेक रोगांपासुन मुक्तता मिळु शकते.

* मोठी विलायची खाल्ल्याने यूरिनेशनसोबतच किडनीचे आजार दुर होतात.

* यामुळे ब्रेस्ट, कोलोन आणि ओवेरियन कँसरचा धोका कमी होऊ शकतो. यामुळे कँसर सेलची निर्मिती आणि विकास थांबतो.

* वेलदोडे खाल्ल्याने केस मजबुत, दाट आणि काळे होतात, यातिल सत्त्वांमुळे केसांना पोषण मिळते. वेलदोडे केसांना मजबुत बनवतात.

* वेलदोडे चांगल्या डिटॉक्सीफायरचे काम करतात. शरीरातील हानिकारक पदार्थांना बाहेर काढून शरीर सुदृढ बनवतात.

* नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार बनते. अ‍ॅटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे त्वचेला होणारी अ‍ॅलर्जीच्या समस्येवर हे चांगला परिणाम करतात.

* दांत आणि हिरड्यांच्या आजारापासुन सुटका होते. तोंडाची दुर्गंधी दुर होते.

* वेदना दुर करण्याची क्षमता असते. डोकेदुखीवर हा रामबाण उपाय आहे. याच्या सुगंधी तेलाने डोकेदुखी, तणाव आणि थकवा यासारख्या समस्या दुर होतात.

* यामध्ये १४ प्रकारचे जीवाणु नष्ट करण्याची क्षमता असते. हे खाल्याने बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन होत नाही.

* ह्रदयरोगांसाठी फायदेशीर आहे. यामुळे कार्डिक रिदम नियंत्रणात राहते. रक्तदाब संतुलित राहतो. नियमित सेवन केले तर ह्रदय निरोगी राहते. यामुळे रक्त गोठण्याची शक्यतासुद्धा कमी होते.

* व्हिटॅमिन आणि आवश्यक खनिज असतात. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु