तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कामाचा वाढलेला व्याप, स्पर्धा, जगण्याची सुरू असलेली धडपड आणि आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे माणसाच्या आयुष्याचा तणाव हा अविभाज्य हिस्सा आहे. तणाव कमी करण्यासाठी काहीजण दारू, सिगारेट किंवा तत्सम पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जातात. मात्र, हा मार्ग अत्यंत चूकीचा आहे. योग्य उपाय केल्यास तणाव नियंत्रणात ठेवता येतो.

तणाव निर्माण होण्याची विविध कारणे असतात. काही वेळा नवी नोकरी, नवी जागा, आर्थिक अडचणी, नवे उद्दिष्ट यामुळे तणाव निर्माण होतो. यावेळी मानसिक ताणतणाव घेण्यापेक्षा कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावून काम केले पाहिजे. तणावाची पुसटशी कल्पना देखील मनात येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तणाव जास्त असल्यावर थकवा येतो आणि थोडी झोप घ्यावे असे वाटते. परंतु, असे न करता तणाव कमी करण्यासाठी कोणत्या तरी कामात स्वत:ला गुंतवून ठेवावे. व्यायाम किंवा कसरत करावी. घरात मेडिटेशन करावे. यामुळे तणाव कमी होईल.

शरीरातील अ‍ॅड्रीनल ग्रंथीतून बाहेर पडणारा कार्टीसोल हार्मोन्स हा स्ट्रेस हार्मोन्स म्हणून ओळखला जातो. व्यक्ती तणावात असताना तो उत्सजिर्त होतो. या हार्मोन्समुळे रक्तातील ग्लूकोजची पातळी कमी होते. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाल्यावर लोकांचे हातपाय गळतात. तणाव आल्यास तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहा. यामुळे तुमचा तणाव कमी होईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु