सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या आपल्या बिझी लाईफचा परिणाम आपल्या सेक्सलाईफवर होत आहे. बिझी शेड्युलमध्ये आपण सेक्सबद्दल आपल्या पाटर्नर सोबत बोलूही शकत नाही. त्यातच आपल्या झोपण्याच्या आणि खाण्याच्या वेळा फिक्स नाहीत. आणि याचाच सर्वात जास्त परिणाम आपल्या सेक्सलाईफवर होत आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवायचा असेल तर खालील आहार घ्या.

१) तुम्ही जर तुमच्या आहारात नॉनव्हेजचा समावेश करत असाल तर तुम्ही मासे आणि अंड्याचे सेवन करा. मासे आणि अंडी खाल्यामुळे तुमच्या शरीराला एनर्जी मिळते.

२) रोजच्या आहारात तुम्ही डाळभाताचा समावेश करा. कारण डाळभात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सनी उपयुक्त असा आहे. मात्र बिना पॉलिश डाळ आणि तांदूळ खा.

३) सेक्स लाईफ एन्जॉय करण्यासाठी आपली एनर्जी लेव्हल चांगली असणे गरजेचे असते. यासाठी आपल्याला प्रोटीनयुक्त डाएट घेणं गरजेचं आहे.

४) आपली सेक्स पॉवर कायम ठेवण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थांचे सेवन करा. हिरव्या भाज्या आणि सलाडचा आहारात समावेश करा. हा आहार घेतल्याने तुम्हाला तुमची सेक्सलाईफ आनंदी जगता येईल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु