लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लहान मुलांची त्‍वचाही खूप सेंसीटिव्‍ह आणि कोमल असते. यामुळे त्‍यांच्‍या स्किनची देखभाल करताना अनेक गोष्‍टींची काळजी घ्‍यावी लागते. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी प्रॉडक्‍ट्सची निवड करताना सावधानता बाळगण्‍याची आवश्‍यकता असते. त्यामुळे खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या बाळाच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.

लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स खालीलप्रमाणे

१) लहान मुलांना आठवड्यातून तीन वेळा फक्त स्‍पॉन्‍ज कोमट पाण्यात बिडवून त्याने लहान मुलांचे अंग पुसून घ्यावे. आणि बाकीचे दिवस बाळाला पाण्याने अंघोळ घालावी. तसेच बाळाला अंघोळ घालताना Baby wash चा वापर करावा. त्यामुळे बाळाची त्वचा मऊ होते.

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

२) बाळाचे अंग पुसताना स्वच्छ कापडाचा उपयोग करा. बाळाचे कपडेही Detergent ने धुवावेत. Baby laundry Deteregent बाळाच्‍या कपड्याला साफ आणि मुलायम बनवते.

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

३) बाळाच्‍या त्‍वचेला दिवसातून दोनदा मॉइश्‍चराइजर किंवा मिल्‍क लोशन लावावे. मात्र मॉइश्‍चराइजर हे चांगल्‍या क्‍वॉलिटीचे असावे. यामध्‍ये मुख्‍यरूपात पाण्‍याशिवाय प्रोपीलीन ग्‍लाईकाल आणि मेरिसिटल मिरिटेट असले पाहिजे. प्रोपीलीन बाळाच्‍या नाजूक त्‍वचेला मुलायम आणि नरम ठेवते. मेरिस्टिल मिरिटेट बाळाच्‍या त्‍वचेचे कंडीशनिंग करते.

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

४) लहान बाळाला डायपर घातल्याने रॅशेस येतात. कारण डायपर हे ओलसर राहिल्यामुळे बाळाला रॅशेज येतात. बाळाच्या झोपेवरही याचा खूप परिणाम होतो. तसेच बाळाच्या त्‍वचेला साफ करण्‍यासाठी बेबी वाइप्‍सचाच वापरा.

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

५) बाळाला रोज Baby Oil ने हलक्‍या हाताने मसाज करा. मसाज केल्याने बाळाचे स्‍नायू मजबूत होतात. आणि बाळ तंदुरूस्‍त राहते. मसाजसाठी नेहमी मिनरल बेस्‍ड ऑइलचाच वापर करावा. बाळाच्‍या त्‍वचेसाठी हे अतिशय चांगले असते.

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु