थंडीत रहा ‘अ‍ॅलर्जी’पासून दूर, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी

थंडीत रहा ‘अ‍ॅलर्जी’पासून दूर, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात विविध प्रकारची अ‍ॅलर्जी होणे ही सर्वसामान्य बाब आहे. वातावरण बदलल्याने, उबदार कपडे घातल्याने, आदी कारणांमुळे काही लोकांना अ‍ॅलर्जी होते. त्वचेला खाज येणे, त्वचा कोरडी पडणे, खोकला, ताप, आदी समस्या होतात. हिवाळा हा अल्हाददायक असतो, अशा हवामानाचा आनंद घेण्यासाठी आणि अ‍ॅलर्जीपासून वाचण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. ही काळजी कशी घ्यावी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

१) कपडे उन्हात वाळवा
बिछाण्यावर पडलेल्या कपड्यांवर अ‍ॅलर्जी पसरवणारे घटक सर्वाधिक असतात. यासाठी गरम पाण्यात कपडे धुवून ते उन्हात वाळवावेत.

२) घराची व्यवस्थित स्वच्छता करा
घराची नियमित स्वच्छता करा. यासाठी व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करणे अधिक चांगले आहे.

३) धुळीपासून संरक्षण
तुमचे घर रस्त्याच्या जवळ असेल तर बाहेरील धुळ घरात येणार नाही, याची काळजी घ्या. यासाठी दरवाजे, खिडक्या शक्यतो बंद ठेवा. खिडक्यांना जाळी लावा अथवा पडदे लावले तरी धुळ येणार नाही.

४) फुलांची अ‍ॅलर्जी
काही लोकांना फुलांच्या वासाने सुद्धा अ‍ॅलर्जी होते. अशा लोकांना या फुलाच्या झाडांपासून दूर रहावे.

५) मास्कचा वापर करा
दुचाकी चालवताना मास्कचा वापर करा. यामुळे धुळ आणि मातीपासून तुमचा बचाव होईल.

६) धुम्रपान करू नका
धुम्रपानामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. यामुळे विविध आजार लवकर जडतात. यासाठी धुम्रपान करू नका.

७) धुरापासून दूर रहा
तुमच्या जवळपास कुणी सिगारेट ओढत असेल अथवा अन्य प्रकारच्या धुराचा त्रास होत असेल तर यापासून दूर रहा.

८) घराच्या भिंती स्वच्छ ठेवा
घराच्या भिंतींवर सर्वात जास्त धुळ असते. या धुळीमुळे अ‍ॅलर्जी होण्याची जास्त शक्यता असते. यासाठी भिंती स्वच्छ करा.

९) शरीर स्वच्छ ठेवा
शरीराच्या स्वच्छतेकडे पूर्ण लक्ष द्या. त्वचा अधिक संवेदनशील असल्याने अंडरगारमेंट्स सकाळ-संध्याकाळ बदला. रोज धुतलेले स्वछ कपडे परिधान करा.

१०) त्वचेची काळजी घ्या
काही लोकांची त्वचा जास्त संवेदनशील असते. एखाद्या विशिष्ट वस्तूच्या संपर्कात आल्यास त्यांना ताबडतोब अ‍ॅलर्जी होते. काही लोकांना इतरांच्या वस्तू वापरल्यास अ‍ॅलर्जी होते.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु