संसर्गजन्य आजार रोखण्यास मदत करेल स्मार्टफोन

संसर्गजन्य आजार रोखण्यास मदत करेल स्मार्टफोन
आरोग्यनामा ऑनलाईन – जवळपास सगळ्यांच्या हाती पोहोचलेल्या स्मार्टफोनची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढतच आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आरोग्यासह विविध क्षेत्रांतील कामे हलकी झाली आहेत. शास्त्रज्ञांनी सांगितले की, आजाराचा शोध घेण्यासाठी आणि संसर्गजन्य आजारांना नियंत्रणात ठेवण्यामध्येही स्मार्टफोनमुळे मदत होऊ शकते. खासकरून मागासलेल्या देशांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी स्मार्टफोन सहाय्यक ठरू शकतो.

ब्रिटनमधील इम्पिरियल कॉलेज लंडन आणि दक्षिण अफ्रिकेतील क्वालुजू-नटाल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, स्मार्टफोनमुळे लोक भविष्यात आपली शारीरिक तपासणी करण्यात आणि तिचे निष्कर्ष जाणून घेण्यात सक्षम होऊ शकतात. हे सगळे काही मिनिटांमध्ये घरच्या घरी केले जाऊ शकते. यामुळे लोक अगदी सहजपणे आपल्या आरोग्यावर नजर ठेवू शकतात. ज्या ग्रामीण भागांमध्ये रुग्णालयांची सोय नाही, तिथे स्मार्टफोनमुळे खासकरून मोठी मदत होऊ शकेल. लोक स्मार्टफोनद्वारे स्वत:च आपली शारीरिक तपासणी करून आजाराचे निदान करू शकतील, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु