पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – उन्हाळ्यात कडक उन्हाळा आणि उकाड्याला कंटाळून कधी एकदाचा पावसाळा येतोय असं आपल्याला वाटत असत. त्यामुळे सगळेजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता पावसाची आतुरता संपली आहे.परंतु पावसाळा आला कि तो येताना अनेक आजार घेऊन येतो. आपल्याला पावसात भिजायला हि खूप आवडत पण यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे पावसाचा आनंद घेत असताना त्वेचेची काळजी घ्या.

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी 

१) आपण उन्हाळयात त्वचा टॅन होऊ नये म्हणून सनस्क्रिन लोशन लावतो. आणि पावसाळ्यात आपल्याला वाटते. कि आता वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्याला सनस्क्रिन लोशन लावायची गरज नाही. परंतु, असं अजिबात करू नका. पावसाळ्यातही त्वचेला सनस्क्रिन लोशन लावायची खूप गरज असते.

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’

२) पावसाळ्यात अनेकजण पिंपल्सच्या समस्येने त्रस्त असतात. चेहऱ्यावर तेलकटपणा आल्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे चेहऱ्याचा तेलकटपणा जाण्यासाठी आपला चेहरा दिवसातून २-३ वेळा साफ करा.

३) मुलींना खुप मेकअप करण्याची सवय असते. परंतु मेकअप थोडा वेळ आपलं सौंदर्य टिकवून ठेवतो. पण खूप मेकअप करणं आपल्या त्वचेला घातक असत. त्यामुळे तुम्ही जरी मेकअप केला तरी तो संध्याकाळी सगळा साफ करा.

४) आणि बाहेरील सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा त्वचा चांगली होण्यासाठी घरगुती उपाय करा. जेणेकरून त्वचेचं सौंदर्य टिकून राहील.

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’

५) त्वचेचं आरोग्य टिकून ठेवण्यासाठी बाहेरील तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नका. आणि पाणी जास्त प्या.

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु