पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पाय सतत थंड पडत असतील तर हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. पाय थंड पडतात याचा अर्थ रक्तप्रवाह सुरळीत नाही, असे असू शकतो. ही समस्या उच्च रक्तदाब, धूम्रपान किंवा हृदयासंबंधीच्या आजारांमुळे होऊ शकते. तसेच उच्च मधुमेहाच्या रूग्णांच्या नसांना दुखापत झाल्यास ही समस्या होऊ शकते. पायांची सूज अथवा वेदना अशा समस्यांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अनेकदा याचा संबंध अनेक गंभीर आजारांशी असू शकतो. यावर योग्य वेळी उपचार केल्यास हानी टाळता येऊ शकते.

वेदनांकडे दुर्लक्ष नको
पायांमध्ये ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत नसल्यास पायांमध्ये दुखणे वाढू शकते. अनेकदा मॅग्नेिशयमच्या कमतरतेमुळेदेखील पाय दुखतात. पाय दुखत असतील तर याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. अशाप्रकारे पाय दुखण्यामागे रक्ताचा प्रवाह सुरळीत नसने हे कारण असू शकते.

पायांना जास्त दिवस सूज
काही जणांच्या पायांना तर खूप वेळ उभे राहिल्याने सुद्धा सूज येते. परंतु, हे लक्षण सुद्धा फार गंभीर नाही. मात्र, ही सूज जास्त काळ राहिल्या ताबतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेतली पाहिजे. यामुळे भविष्यातील गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. गरोदर महिलांच्या पायावर सूज येणे, लांबचा प्रवास केल्याने पाय सूजणे तसेच पाय लोंबकळत ठेवून खूप वेळ बसल्याने सूज येणे, सर्वसामान्य लक्षण आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु