मीठपाणी ‘या’ आजारांसाठी फायदेशीर

मीठपाणी ‘या’ आजारांसाठी फायदेशीर

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्य चांगले राखणे किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे अनेक रोगांनी आपल्या शरीरात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कितीही धावपळ असली तरी आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण खालील काही घरगुती उपाय करू शकतो.

१) मीठपाण्यामुळे तोंडातील लाळनिर्मिती करणार्‍या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. त्यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्स जे नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि प्रथिने पचवण्याचे काम करतात. त्यांना पचवण्यास लाळेची मदत होते. त्याशिवाय पोटातील यकृत, आतडे यांच्यामध्ये अन्‍न पचनास आवश्यक एन्झाईम्स निर्माण होतात.

२) वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आपल्या शरीरातील खनिजे आणि कॅल्शिअम कमी होत जाते. आणि हाडे कमजोर होऊ लागतात. त्यामुळे हाडे तुटूही शकतात. अशा परिस्थितीत मीठ पाणी प्यायल्याने हाडातील खनिजांची पूर्तता होऊन हाडे मजबूत होतात. त्यासाठी रोज नियमितपणे या पाण्याचे सेवन करावे.

३) कोमट पाण्यात काळे मीठ घालून प्यायल्यास शरीरातील अतिरिक्‍त चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे स्थूलपणा दूर होतो. त्याशिवाय शरीरातील कोलेस्ट्रोलची पातळी घटते. त्यामुळे मधुमेहासारखा जीवघेणा आजार होण्याची शक्यता कमी होते.

४) रक्‍तातील कार्टिसोल आणि अ‍ॅड्रिनल वाढण्यास मीठामुळे मदत होते. ही सर्व हार्मोन्स तणावाशी निगडित आहेत. या हार्मोन्सचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाल्यास झोप चांगली लागते. अनिद्रेची समस्या असल्यास काळे मीठ घातलेले पाणी जरूर प्यावे.

५) यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहाण्यास मदत होते. तसेच आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम होतो. तसेच त्वचेची लवचिकता वाढते आणि त्वचा सदोदित मऊ मुलायम राहते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु