पेनकिलर घेण्याआधी ‘हे’ वाचा, अशी घ्या काळजी, अन्यथा होतील दुष्परिणाम

पेनकिलर घेण्याआधी ‘हे’ वाचा, अशी घ्या काळजी, अन्यथा होतील दुष्परिणाम

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांची एखादे किरकोळ दुखणे सुद्धा सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. शरीरात वेदना होत असतील तर ताबडतोब वेदनाशामक गोळी म्हणजेच पेनकिलर घेतली जाते. डोकेदुखी, हात-पाय दुखणे, स्नायू दुखणे. अशा किरकोळ वेदनांसाठीही मेडिकलमधून आणलेली पेनकिलर लगेच घेतली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारे पेनकिलर घेणे धोकादायक ठरू शकते. पेनकिलर घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

ही काळजी घ्या

१ कोणतीही गोळी उपाशीपोटी घेऊ नका.
२ पेन किलरच्या गोळ्यांची सवय लावून घेऊ नका.
३ गोळी घेताना भरपूर पाणी प्या.
४ दोन दिवसांपेक्षा जास्त काळ दुखणे सुरू असेल तर डॉक्टरांकडे जा.
५ गोळ्यांच्या दुष्परिणामांविषयी डॉक्टरांकडून माहिती घ्या.
६ दारू आणि पेनकिलर एकत्र घेणे धोकादायक आहे.
७ एकापेक्षा आधिक पेनकिलर घेवू नका.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु