चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव

चमकणाऱ्या ‘विजांपासून’ असा करा स्वतःचा बचाव

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – पावसाळा हा आपल्याला हवाहवासा वाटतो. परंतु , पावसाळा आला कि आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येतो. त्यातीलच एक सर्वात मोठी समस्या म्हणजे पाऊस सुरु असताना चमकत असणाऱ्या विजा. वीज अंगावर पडल्यानंतर माणूस मृत्युमुखी पडतो. त्यामुळे विज अंगावर पडण्याची सर्वांनाच भीती वाटत असते. परंतु ,आपण पाऊस सुरु असताना आपण जर योग्य काळजी घेतली तर आपल्या अंगावर वीज पडण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे पाऊस सुरु असताना घराबाहेर पडणार असाल तर स्वतःची योग्य काळजी घ्या. जेणेकरून तुमच्या अंगावर वीज पडणार नाही.

विजा चमकत असताना घ्या ही काळजी 

१) पाऊस सुरु असताना तुम्ही जर एखादे वाहन चालवत असाल तर वाहन एका बाजूला लावून एखाद्या सुरक्षित ठिकाणी जा. आणि आपला मोबाईल बंद करून ठेवा. जेणेकरून आपल्या अंगावर वीज पडण्याची शक्यता राहणार नाही.

२) पाऊस सुरु असताना वीज चमकत असतील तर घरातील फ्रिज तसेच पाण्याचा नळ या गोष्टींचा वापर करू नका.

३) घरातील लाईट इतरवेळी जरी चालू असली तरी वीज चमकत असताना मात्र लाईटवर चालणाऱ्या कोणत्याच वस्तू वापरू नका.

४) पावसाळ्यात विजा चमकत असताना झाडावर विज पडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या घराच्या जवळ कमी उंचीची झाडे लावा.

५) पावसाळ्यात कधी पाऊस येईल ते सांगता येत नाही. त्यामुळे अनेकजण आपल्या कामासाठी घराबाहेर गेलेले असतात. अशावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु झाला. तर कमी उंचीच्या किंवा दाट झाडाचा आडोसा घ्या.

६) विजा चमकत असतील तर जिथे जास्त पाणी आहे. तिथून दूरच राहा.

७) पाऊस सुरु असताना विजा चमकत असतील आणि तुम्ही जर फोरव्हिलरमध्ये असाल तर गाडीतच बसून रहा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु