‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकदा हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी औषधे नसतात त्यामुळे रुग्णांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. अशामध्ये ‘हायफकिन’ने पुढाकार घेतला आहे. लोकांना स्वस्त दरात औषधे मिळावी म्हणून आणि रुग्णांना वेळेवर औषधे आणि गोळ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी औषध आणि गोळ्यांचा नवीन विभाग ‘हाफकिन’ मध्ये सुरु केला जाणार आहे.

या विभागाचे सगळे काम झाले असून शेवटची काही किरकोळ कामे राहिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प काही दिवस थांबला आहे. सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर हा प्रकल्प सरु करण्यात येणार आहे. या सर्व सूचना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्याला दिल्या आहेत. रावल यांनी या प्रकल्पाला शुक्रवारी भेट दिली.

जगभरात दरवर्षी सुमारे ५० हजार लोकांना श्वानदंशाची लागण होते. या श्वादंशाचे प्रमाण राज्यात मोठ्या प्रमाणावर घडत असतात. त्यामुळे महामंडळाने आपल्या हाती घेतलेल्या टिश्युकल्रचर तंत्रज्ञानावर आधारित जास्त सुरक्षित आणि गुणवत्ताधारक रेबीज लस उत्पादनाच्या प्रकल्पास आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही रावल यांनी स्पष्ट केले आहे. महामंडळातर्फे सर्पविषाचे मानकीकरण करण्याचे देश पातळीवर केंद्र देखील उभारण्यात येत आहे. यासाठी त्यांनी २३ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

यानंतर रावल यांनी असेही आश्वासन दिले की, विष संशोधन केंद्र सुरु करण्याची मागणी महामंडळाने केली या सर्व प्रकल्पासाठी राज्य शासनातर्फे सहकार्य करण्याबरोबरच केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा करु.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु