सुखी वैवाहिक जीवनासाठी प्री-मॅरिटल चेकअप गरजेचे

सुखी वैवाहिक जीवनासाठी प्री-मॅरिटल चेकअप गरजेचे

आरोग्यनामा ऑनलाइन – कपल प्री मॅरिटल चेकअप ही एक स्टॅन्डर्ड प्रोसिजर आहे. ज्या कपल्सना लग्न करायचे असते त्यांनी सुखी वैवाहिक जीवनासाठी ही टेस्ट करणे गरजेचे आहे. प्री मॅरिटल चेकअपमध्ये व्हर्जिनीटी टेस्टही केली जाते असा अनेकांचा गैरसमज आहे. लग्न करणारे जोडपे शारीरिक रुपाने लग्नासाठी किती तयार आहे यासंबंधीच्या वेगवेगळ्या टेस्टचा यामध्ये समावेश असतो. या सर्व टेस्टला प्रीमॅरिटल चेकअप म्हणतात.

विवाहेच्छुक जोडप्यासाठी ब्लड ग्रुप टेस्ट करणे महत्वाचे असते. या तपासणीत आरएच फॅक्टर तपासला जातो. कारण पुढे महिलेस बाळंतपणात अडचणी येऊ शकतात. तसेच इन्फर्टिलिटी स्क्रीनिंग टेस्ट सुद्धा महत्वाची असते. इन्फर्टिलिटी स्क्रीनिंगबाबत एक गैरसमज असतो की ही टेस्ट केवळ मुलींसाठीच असते. पण ही टेस्ट दोघांसाठी असते. मुलींमध्ये रिप्रॉडक्शन हर्मोन्स म्हणजेच एफएसएच, एलएच, प्रोलॅक्टीन आणि पीसीओएस ही टेस्ट केली जाते. हे चेकअप ब्लड टेस्ट आणि अल्ट्रासाउंडने केले जाते. तसेच पुरूषाला इन्फर्टिलिटी स्क्रीनिंगसाठी स्पर्म सॅम्पल द्यावे लागतात. एड्सची तपासणी सुद्धा रक्ताचे नमुणे घेऊन करण्यात येते.

हार्ट डिजीज, डायबिटीज, लिव्हर, ब्लड-प्रेशर आदी काही टेस्ट केल्या जातात. हे आजार कधीही होऊ शकतात, या आजारांच्याही तपासण्या लग्नापूर्वी केल्यास ते उपचाराच्यादृष्टीने महत्वाचे ठरू शकते. कपल चेकअप ही एकमेकांमध्ये ताळमेळ वाढवण्यासाठी केली जाणारी सायकॉलॉजिकल टेस्ट असून ती ऑनलाइन टेस्टप्रमाणे असते. या टेस्टमध्ये साथीदाराची साथ द्यायची असते. याने रिलेशनशिपच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाबी स्पष्ट होतात. ही टेस्ट एका प्रश्नावलीच्या स्वरुपात असते. ही प्रश्नावली पूर्ण केल्यानंतर सुमारे पंधरा पानांचा अहवाल प्राप्त होतो. हा अहवाल तपासून दोघेही आपआपल्यातील उणीवा जाणून नाते अधिक मजबूत करू शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु