गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिला गरोदर असली की तिच्या पोटातील बाळाविषयी विविध लक्षणांवरून अनेक तर्कवितर्क लढविले जातात. मुलगा होणार की मुलगी, एकच होणार की जुळे, असे अनेक अंदाज लावले जातात. अशाच प्रकारचे काही समज आणि गैरसमजांविषयी आपण माहिती घेणार आहोत.

प्रेग्नेंसी काळात सेक्स केल्यास बाळाला नुकसान पोहोचते असे म्हटले जाते. मात्र, बाळाचे संरक्षण करण्यासाठी पोटामध्ये अ‍ॅब्डॉमिनल वॉलपासून ते अ‍ॅमनियॉटिक पिशवीपर्यंत सात लेयर्स असतात. यासोबतच गर्भाशय ग्रीव्हा गर्भाशयामध्ये काहीही जाण्यापासून रोखते आणि गर्भ क्लिक आणि इन्फेक्शन फ्री ठेवते. सेक्स केल्याने काहीसुद्धा बाळापर्यंत पोहोचत नाही. मात्र डॉक्टरांनी सेक्स करण्यास मनाई केली असल्यास यापासून दूर राहावे.

जर महिलेच्या पोटाचा आकार जास्त मोठा असेल तर मुलगी होणार आणि लहान असेल तर मुलगा असा सुद्धा एक समज आहे. मात्र, तज्ज्ञ सांगातात की, पोटाचा आकार पाहून बाळाचे लिंग सांगता येत नाही. पोटाचा आकार हा महिलेची मसल्स साईझ, स्ट्रक्चर, भ्रूणाची पोझिशन, पॉश्चर, पोटाच्या जवळपास जमा असलेल्या फॅटवर अवलंबून असतो.

आंबट खाण्याची इच्छा झाल्यास मुलगा आणि गोड खाण्याची इच्छा झाल्यास मुलगी होते, असाही एक गैरसमज आहे. पण, खाण्याच्या इच्छेचा आणि बाळाच्या लिंगाचा काहीही संबंध नाही. तसेच जर महिलेला हृदयात जळजळ असल्यास असे मानले जाते की, होणाऱ्या बाळाचे केस जास्त आणि चांगले असतील. परंतु, प्रेग्नेंसी काळात हार्टबर्न होणे सामान्य गोष्ट आहे. याचा बाळाचे केस कमी किंवा जास्त असण्याशी काहीही संबंध नाही. गरोदर महिलेच्या आईची प्रेग्नेंसी सहजपणे झाली असेल तर मुलीचीसुद्धा तशीच होईल, असाही एक गैरसमज असून आनुवंशिकतेचा प्रेग्नेंसीशी काहीही संबंध नाही. डिलिव्हरी कशी होणार हे बाळाचा आकार आणि पोझिशन, आईचा आहार आणि जीवनशैलीवर अवलंबुन असते.

पाठीवर झोपल्यास बाळाला नुकसान पोहोचते, असेही म्हटले जाते. मात्र, या स्थितीमध्ये झोपल्यास बाळाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. एक्स्पर्ट डाव्या कुशीवर झोपण्यास सांगतात कारण यामुळे गर्भाशय आणि नाळमध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहतो. पहिले मुल उशिराच जन्म घेते, असेही म्हटले जाते. परंतु, मूल लवकर किंवा उशिरा जन्माला येणे हे महिलेच्या मेन्स्ट्रूअल सायकलवर (मासिक पाळी) अवलंबलून असते. एखाद्या महिलेची ही सायकल लहान असल्यास मुल लवकर जन्माला येण्याची शक्यता असते आणि सायकल मोठी असल्यास मुल उशिराने जन्म घेते. गरोदर महिलेच्या जवळ अंगठीला दोरा बांधून नेल्यास अंगठी मागील बाजूस गेल्यास मुलगा होतो आणि अंगठी गोल फिरल्यास मुलगी होते, असाही एक गंमतीदार गैरसमज काही लोकांमध्ये आहे. मात्र, हे साफ खोटे आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु