पूजेतील शंख ‘या’ रोगांमध्येही ठरतो खूप उपयोगी, जाणून घ्या 

पूजेतील शंख ‘या’ रोगांमध्येही ठरतो खूप उपयोगी, जाणून घ्या 

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सनातन धर्मातील अनेक गोष्टींच्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टीकोन असल्याचे काळाच्या ओघात स्पष्ट झाले आहे. शंख ठेवल्याने, वाजवल्याने आणि यातील पाण्याचा योग्य वापर केल्याने विविध प्रकारचे लाभ होतात. शंख वाजवण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. लोक शंख देवघरात ठेवून त्याची नियमितपणे पूजा करतात. परंतु या शंखाचे इतरही खास फायदे आहेत. काही लाभ तर आरोग्याशी संबंधित आहेत. शंखापासून होणारे काही खास फायदे आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत फायदे

* रात्री शंखमध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर शंखातील पाण्याने त्वचेची मालिश करा. या पाण्याने त्वचारोग बरे होतात.

* शंखामध्ये रात्री गुलाबजल टाकून पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर या पाण्याने केस धुवून घ्या. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास केस सिल्की होतात.

* अपचन आणि पोटदुखीचा त्रास असेल तर शंखातील दोन चमचे पाण्याचे सेवन करावे.

* स्नान केल्यानंतर शंख गालांवर रगडा. या उपायाने नैसर्गिक उजळपणा येईल.

* डोळ्यांखाली काळे वर्तुळ झाले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिट डोळ्यांच्या जवळपास शंखाने मालिश करा.

* शंखामध्ये ३-४ तास पाणी भरून ठेवा. त्यानंतर हा पाण्याचा उपयोग उपचारांसाठी केला जाऊ शकतो. हे पाणी काही विशेष आजारांमध्ये लाभदायक आहे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु