श्रीदेवीने २९ वेळेस केली होती ‘प्‍लास्टिक सर्जरी’, जाणून घ्‍या याचे ‘साइडइफेक्‍ट्स’

श्रीदेवीने २९ वेळेस केली होती ‘प्‍लास्टिक सर्जरी’, जाणून घ्‍या याचे ‘साइडइफेक्‍ट्स’

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी सौदंर्य वाढवण्‍यासाठी तब्‍बल २९ वेळेस प्‍लास्टिक सर्जरी केली होती. शेवटच्‍या सर्जरीत काहीतरी गडबड झाल्‍याने त्यांना औषध घ्यावे लागत होते. त्या कॅलिफोर्नियातील डॉक्‍टरांच्‍या मार्गदर्शनाखाली डाएट पिल्‍स आणि अँटी एजिंग औषधे घेत होत्या. कधी कधी प्‍लास्टिक सर्जरी करणे आरोग्‍यास घातक ठरू शकते. प्‍लास्टिक सर्जरीमुळेकोणत्‍या समस्‍या होऊ शकतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

हे आहेत धोके

नर्व्हस सिस्‍टीम डॅमेज, पिगमेंटेशन, रक्‍त साचणे अशा विविध समस्‍या प्‍लास्टिक सर्जरीमुळे होऊ शकतात.

धुम्रपान करणारांची सर्जरीची जखम लवकर भरत नाही.

काहींच्या श्‍वसन प्रणालीमध्‍ये बिघाड होतो.

कार्डियक अरेस्‍टचा त्रास होऊ शकतो.

संबंधित व्‍यक्‍तीला इंफेक्‍शनही होऊ शकते.

शरीरात हार्मोनल चेंजेस झाल्याने आरोग्‍य व त्‍वचेवर वाईट परिणाम होतो.

प्‍लास्टिक सर्जरी करताना थोडीशी चूक झाली तरी आयुष्‍यभर त्रास सहन करावा लागू शकतो.

अशी घ्या काळजी

* सर्जरीपूर्वी डॉक्‍टरचा रेकॉर्ड व त्‍याचा अनूभवही जाणून घ्‍या.
* सर्जरीपूर्वी महत्‍त्‍वाची कामे आटोपून घेणे कधीही उत्‍तम.
* प्‍लास्टिक सर्जरी करण्‍यापूर्वी याच्‍याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घ्‍या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु