उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन – उच्च रक्तदाबाची समस्या वेगवेगळ्या कारणांनी वाढू शकते. कामाचा दबाव सहन होत नसल्याने अशावेळी थोडावेळ आराम केला पाहिजे. पुरेशी झोप न घेतल्यानेही तणाव वाढू शकतो. एका संशाधनानुसार कामाचा वाढता ताण आणि पुरेशी झोप न मिळाल्यास हाय बीपीने ग्रस्त रूग्णांमध्ये हृदयरोगाने मृत्यू होण्याचा धोका तीन पटीने अधिक वाढतो.झोपेमुळे ऊर्जेचा स्तर कायम राहतो. तसेच यामुळे आराम आणि तणावमुक्ती मिळते.  कामाचा तणाव असल्यास पुरेशा झोपेमुळे तणाव दूर होऊ शकतो. परंतु, पुरेशी झोप न मिळाल्यास कामाचा तणाव वाढत जातो आणि यामुळे होणारे परिणाम हे घातक असतात.

एका संशोधनासाठी २५ ते ६५ वयोगटातील २ हजार कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते. यांना हाय बीपीचा त्रास होता. पण हृदयरोग किंवा डायबिटीस नव्हता. पण तणाव असलेल्या आणि चांगली झोप घेतलेल्या लोकांच्या तुलनेत दोन्हींमध्ये हृदयरोगामुळे मृत्यूचा धोका तीन पटीने अधिक होता. यूरोपिय जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव कार्डिओलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे की, कामाच्या तणावामुळे लोकांमध्ये १.६ टक्के अधिक धोका वाढतो. तसेच चांगली झोप न घेणाऱ्यांमध्ये हा धोका १.८ टक्के अधिक असतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु