उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अलिकडच्या काहात उच्च रक्तदाब ही समस्या बहुतांश लोकाना सतावत आहे. धमन्यांमध्ये रक्तदाब वाढल्याने धमन्यांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हृदयाला जास्त काम करावे लागते. हा अतिशय गंभीर आजार असला तरी अनेकांना त्याचे गांभिर्य ठाऊक नसते. उच्च रक्तदाबामुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते. काही घरगुती उपाय करून ही समस्या नियंत्रणात ठेवता येणे शक्य आहे.

टोमॅटो
लाल टोमॅटोचे नियमित सेवन केल्यास उच्च रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते. यासाठी सलाडमध्ये टोमॅटो अवश्य खावे.

लिंबूचा रस
लिंबूच्या रसाने रक्त वाहिन्या कोमल आणि लवचीक होतात. यामुळे रक्तदाब सामान्य राहतो. हे हार्टअटॅकचा धोका कमी होतो.

बीट
बीटाचा एक ग्लास ज्यूस नियमित प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित होतो. हे मासपेशींची ऑक्सीजनची गरज कमी करते.

लसूण
रक्त घट्ट होणे हे उच्च् रक्तदाबाचे मोठे कारण असते. लसूण रक्ताला घट्ट होऊ देत नाही. कोलेस्टेरॉल नियंत्रित करतो.

आले
आल्यामधील अँटीऑक्सीडेंट्स कोलेस्टेरॉल कमी करतात. रक्त प्रवाह सुरळीत होतो. धमन्यांच्या आसपासच्या मासपेशींना आराम मिळतो. उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते.

इलायची
इलायचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि खनिज पोटॅशियम असते. इलायचीच्या नियमीत सेवनाने बॉडी टॉक्सिक मुक्त होते. रक्त प्रवाह सुरळीत राहतो.

लालमिर्ची
लाल मिर्चीच्या सेवनाने उदासीन रक्तवाहिन्या रुंद होता आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.

कांद्याचा रस
कांद्याचा रस रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करुन ब्लड प्रेशरला नियंत्रित करतो. कांदा रक्त स्वच्छ करुन नर्वस सिस्टमला मजबूत बनवतो. कांद्याचा रस आणि मध सम प्रमाणात मिसळून दिवसातून दोन चमचे एक वेळा घेतल्याने रक्तदाबाची समस्या दूर होते.

ताजे दही
उच्च रक्तदाब असल्यास जेवणात ताजे दही खावे. योग्य प्रमाणात दही खाल्ल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते.

टरबूज बीया आणि खसखस
टरबूजाच्या बीयांमधील गर आणि खसखस दोन्हीही सम प्रमाणात घेऊन बारीक करा. हे रोज सकाळ संध्याकाळ उपाशापोटी पाण्यात टाकुन एक चमचा घ्या. एक महिना याचे सेवन करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु