लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरुषांच्या कमरेच्या चारही बाजूचा घेर ४० इंचांपेक्षा जास्त आणि महिलांचा ४० इंचांपेक्षा जास्त असल्यास ओव्हरवेट मानले जाते. वजन जास्त असेल तर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. लठ्ठपणामुळे अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. ज्यामध्ये हृदय, फुप्फुस, किडनी, यकृत, मेंदूसंबंधी आजारांचा समावेश आहे.

लठ्ठपणामुळे वाढलेल्या चरबीमुळे श्वास घेण्यास अडचण निर्माण होते. रक्तामध्ये ऑक्सिजन कमी होते आणि कार्बनडायऑक्साइड जास्त होते. तसेच नसांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे हृदयापर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचण्यात अडचणी येतात. यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. शरीरात जास्त चरबी आणि ग्लुकोजला इन्सुलिन नामक हार्मोन योग्य प्रकारे जाळू शकत नाही. यामुळे साखर वाढू शकते. अतिरिक्त चरबी शरीरातील पेशींना नुकसान पोहोचवणारे हार्मोन्स निर्माण करतात. यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते. शिवाय वाढलेल्या वजनामुळे गुडघे, हिप्स आणि शरीराच्या मागील भागावर जास्त दबाव पडतो. यामुळे ऑस्टियो आर्थरायटिसची समस्या होऊ शकते.

ब्रेनपर्यंत ब्लड आणि ऑक्सिजन पोहोचवणाऱ्या नलिकांमध्ये फॅट जमा होते. यामुळे ब्लड क्लॉटिंग होऊ शकते. यामुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. मानेच्या आजूबाजूची चरबी झोपताना श्वासनलिकेत अडचण निर्माण करते. स्लीप एप्निया म्हणजे झोपेची समस्या होऊ शकते. लठ्ठपणामुळे ओटीपोटात सूज येऊ शकते. यामध्ये चरबी जमा होऊन खड्याचे रूप घेऊ शकते. कंबर आणि पोटात वेदना होऊ शकतात. लठ्ठपणा आणि वाढलेले पोट कमी करण्यासाठी दालचिनी सोबत मध घेतल्याने फायदा होतो. हा एक असा उपाय आहे जो दोन मिनिटांत तयार केला जातो. याने फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते आणि पोटाची चरबी कमी होते. दोन मोठे चमचे दालचिनी पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून गरम करा. आता हे गार होऊ द्या आणि या मिश्रणाचे दोन भाग करा. एक भाग नाष्ट्यापूर्वी आणि दुसरा रात्री झोपण्यापूर्वी खावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु