आता दम्याची चाचणीही करता येते ‘ऑनलाइन’, अशी आहे पद्धत

आता दम्याची चाचणीही करता येते ‘ऑनलाइन’, अशी आहे पद्धत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्य क्षेत्रातही विविध ऑनलाइन सेवा आता उपलब्ध झाल्या आहेत. हृदयाची कार्यक्षमात किती आहे. याची तपासणी करण्यासाठी एक ऑनलाइन टेस्ट उपलब्ध आहे. तसेच दम्याचीही अशाच प्रकारची टेस्ट ऑनलाइन उपलब्ध आहे. दम्याचा झटका आल्याची शक्यता असल्याबाबत तपास करण्यासाठी इंग्लंडमध्ये एक ऑनलाइन टेस्ट उपलब्ध आहे.

या ऑनलाइन टेस्टद्वारे दम्याचे रुग्ण झटका येण्याची शक्यता असल्याचा शोध घेऊ शकतील. तसेच संकेतस्थळावर दम्याच्या झटक्याची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक असलेली इतर माहितीही उपलब्ध करून देण्यात आली असल्याने त्याचा रूग्णांना चांगला लाभ होत आहे. या टेस्टला ट्रिपल ए : एवायड असे म्हटले जाते. वेबसाइट उघडल्यावर संबंधित व्यक्तीला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात.

त्या आधारे त्यास दम्याच्या स्थितीबाबत सल्ला दिला जातो. टेस्टचे रिझल्ट तीन कॅटेगरीमध्ये आहेत. प्रत्येक कॅटेगरी वेगवेगळ्या रंगाने दाखविण्यात आलेली आहे. तसेच टेस्टचे रिझल्ट सांगर्णाया कॅटेगरीसह दम्यावर नियंत्रणाच्या पद्धतीही सांगण्यात येतात. दम्याबाबत जागरूक करणे आणि सावधगिरी बाळगण्यास प्रेरित करणे हा या ऑनलाइन टेस्टचा उद्देश आहे. ही टेस्ट कुठूनही केली जाऊ शकते. त्यासाठी केवळ संबंधित वेबसाइटवर दम्याबाबत खरी माहिती भरावी लागेल.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु