नैसर्गिक पद्धतीने टिकवून ठेवा तारुण्य, असे राहा दीर्घकाळ तरुण

नैसर्गिक पद्धतीने टिकवून ठेवा तारुण्य, असे राहा दीर्घकाळ तरुण

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तरूण दिसण्यासाठी विविध प्रकारच्या क्रिम्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या जाहिरातीही मोठ्या आकर्षक पद्धतीने केल्या जातात. परंतु, त्यांचा किती चांगला परिणाम होतो, हे कधीच समजत नाही. या कंपन्या क्रिम्सबाबत विविध दावे करतच असतात. अनेक जण तर कंटाळून त्यांचा वापर करणे सोडून देतात. परंतु, काही सवयी अशा आहेत, ज्याद्वारे नैसर्गिक पद्धतीने तारूण्य टिकवता येते.

या सवयी लावून घ्या

* पायांत वेदना होत असेल तर फूट जीम नावाचे गॅजेट तुमच्या उपयोगी पडू शकते. त्याच्यामुळे पायांना आराम मिळेल. यात पायांच्या मसाजसाठी वेगवेगळ्या अ‍ॅटेचमेंट आहेत. यावर पाय फिरवावा लागतो. त्याने पायांच्या स्नायूला आराम मिळतो. यात काही प्लेन स्टीक आहेत.

* जे सकाळी लवकर उठतात, ते सकाळी उशिरा उठतात त्यांच्या तुलनेत आनंदी आणि निरोगी राहतात. युवकांसाठी सहा ते सात तास झोप आवश्यक मानली जाते. लवकर उठल्यास दिवसाची सुरुवातही लवकर आणि चांगली होते. लवकर उठल्यास रात्री वेळेवर झोप येते.

* दीर्घकाळ तरुण दिसण्यासाठी दिवसातून ४०-४५ मिनिटे व्यायाम करणे गरजेचे आहे. मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सकाळी वायू प्रदूषण आणि उष्णताही कमी असते.

* चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थ खाऊ नये. जंक फूड आणि बाजारात मिळणारे फास्ट फूड आरोग्यासाठी चांगले नाहीत. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश करावा. योग्य आहार घेतल्यास अनेक आजार होऊ शकतात.

* चांगली आणि प्रेरणादायक पुस्तके वाचावीत. पुस्तके वाचण्यास वेळ मिळत नसेल तर मित्र किंवा कुटुंबासोबत चर्चा करावी, संगीत ऐकावे. यामुळे जीवन सकारात्मक होईल. आठवड्यातून एकदा सुट्टी घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु