स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पुरुषांमधील प्रोटेट ग्रंथीच्या विकाराच्या तक्रारी खूप वाढलेल्या आहेत. वाढत्या वयातील प्रोस्टेट ग्रंथीची वाढ हा आजार नसून वाढत्या वयात घडून येणारा तो एक बदल आहे. सर्वांनाच त्याचा त्रास होतो असे नाही. पण खूप जणांना साठीच्या आसपास हा त्रास होतो. स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही मेनोपॉज येतो. पुरुषांमधील मेनोपॉजला वैद्यकीय भाषेत ‘अँड्रोपॉझ’ असं म्हणतात. या काळात प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढण्यास सुरुवात होते.

प्रॉस्टेट ग्रंथीचे कार्य

प्रॉस्टेट या पुनरुत्पादक ग्रंथीमध्ये वीर्य तयार होते.
पुरुषातील हार्मोन्सच्या संकलित प्रमाणावर प्रोस्टट ग्रंथीचे कार्य अवलंबून असते. वार्धक्यामध्ये पुरुषांतील हार्मोन्सच्या प्रमाणात जी कमतरता उत्पन्न होते, त्यामुळेच प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झालेली असते. या ग्रंथीचा आकार वाढल्यावर मूत्राशयाचे मुख आवळले जाऊन मूत्रविसर्जन अवघड होते.

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

प्रॉस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे होणारे आजार

प्रॉस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे मूत्रवाहिनीवर दाब येऊन मूत्रवहनात अडथळे निर्माण होतात. परिणामी मूत्राशयात खडे होण्याची शक्‍यता वाढू लागते. प्रॉस्टेट ग्रंथी वाढल्याने मूत्रनलिकेतील रक्तवाहिन्या रुंदावतात, त्या फुटू शकतात व लघवीतून रक्त जाऊ लागते. लघवी बाहेर पडण्याला येणारा अडथळा वाढत जातो. अखेर मूत्रपिंडावर त्याचा दुष्परिणाम होऊ लागतो व मूत्रपिंडाचे कार्य नीट होईनासे होते. अखेर मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात. त्यामुळे प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीकडे दुर्लक्ष करता कामा नये.

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु