अनेक आजारांवर रामबाण उपाय ‘हरड’, नियमित सेवन केल्याने दूर राहतील आजार

अनेक आजारांवर रामबाण उपाय ‘हरड’, नियमित सेवन केल्याने दूर राहतील आजार

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्राचीन काळापासून आयुर्वेद उपचार पध्दतीमध्ये हरड या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात आहे. हरडमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून यामध्ये व्हिटॅमिन सी आणि भरपूर खनिज असतात. यामुळे आरोग्याचे विविध फायदे आहेत. हरडचे कोणते आरोग्य फायदे होतात याविषयी माहिती घेवूयात.

हे फायदे होतात
१)
हरडचे पल्प बध्दकोष्ठता दूर करण्यासाठी लाभदायक आहे. हे पल्प चिमुटभर मीठासोबत खावे. १/२ ग्राम लवंग किंवा दालचिनीसोबत सेवन करावे.
२) नियमित हरडचे सेवन केल्याने वजन कमी होते. पचनक्रियेमध्ये हे फायदेशीर असते. गॅस, अ‍ॅसिडिटी आणि इतर समस्यांपासून आराम देते. लठ्ठपणा कमी होतो.
३) तोंडात सूज आल्यावर हरडच्या काढ्याने गुळण्या करा.
४) हरडचा पल्प ताकासोबत मिसळून गुळण्या केल्याने हिरड्यांची सूज कमी होते.
५) हरडचे चुर्ण दुखत असलेल्या दातांवर लावल्यामुळे दुखणे थांबते.
६) हरड वापरल्याने केस काळे, चमकदार आणि आकर्षत दिसतात.
७) हरडचे फळ खोबरेल तेलात उकळून लेप बनवा आणि हे केसांवर लावा. रोज ३-५ ग्राम हरड पावडर एक ग्लास पाण्यासोबतच सेवन करा.
८) हे फळ पाण्यात उकळून काढा बनवा आणि दिवसातून दोन वेळा याचे नियमित सेवन केल्यास लवकर आराम मिळतो.
९) उन्हामुळे किंवा एखादा पदार्थ खाल्ल्यामुळे अ‍ॅलर्जी झाल्यास शरीराच्या तो भाग हरडच्या काढ्याने धुवून घ्या.
१०) फंगल अ‍ॅलर्जी किंवा संक्रमण झाल्यावर हरडचे फळ आणि हळदीचा लेप त्या भागावर दिवसातून दोन वेळा लावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु