औषधी गुणांनी भरपूर आहे ‘लेमन ग्रास टी’, रोगांचा धोका होतो दूर

औषधी गुणांनी भरपूर आहे ‘लेमन ग्रास टी’, रोगांचा धोका होतो दूर

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लेमन ग्रास टीमधील औषधी गुणांमुळे इम्यून सिस्टम मजबूत होते. यासोबतच अनेक आजारांपासून बचाव होतो. इम्यून सिस्टम मजबूत ठेवण्यासाठी लेमन ग्रास टी खुप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी, फोलेट, फोलिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम, कॉपर पोटॅशियम, फॉस्फोरस, कॅल्शियम आणि मॅगनीज असते. अँटीबँक्टेरियल, अँटीफंगल, कँसरविरोधी गुण असतात.

हे आहेत फायदे

* यामधील अँटीसेप्टिक कंपाउंडमुळे पोटातील हानिकारक बॅक्टेरिया आणि पॅरासाइड्स मरतात. यामुळे बध्दकोष्ठता, डायरिया, अपचन, पोटदुखीची समस्या होत नाही.

* हे कोलेस्टेरॉल आणि ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवते.

* रोज लेमन ग्रास टी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. यूरिनव्दारे विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे किडनी, लिव्हर, ब्लेंडर आणि पँक्रियाजची स्वच्छता होते.

* यामध्ये भरपूर अँटीबँक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात. यामुळे कफ, ताप आणि पडस्यापासून आराम मिळतो. यामधील व्हिटॅमिन इम्यून सिस्टिम मजबूत बनवते.

* यामधील अँटी ऑक्सीडेंट्स तत्त्व कँसरच्या कोशिकांना नष्ट करतात.

* यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि पेन-रिलीविंग प्रॉपर्टीज असतात. यामुळे जॉइंट पेनपासून आराम मिळतो.

* हे फंगल इन्फेक्शन दूर करते. यामुळे पिंपल्स होत नाहीत. ऑयली स्किन असेल तर हे पिऊ नये.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु