३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन – पुरूषांमध्येही तीस अथवा चाळीस वयानंतर काही बदल दिसू लागतात. जीवनशैलीनुसार त्यांना ब्लड प्रेशर तसेच कोलेस्टेरॉल वाढण्याच्या समस्यांना जाणवू लागतात. यासाठी लहानपणी तसेच तारूण्यात निरोगी जीवनशैली असणे गरजेचे असते. यामुळे अशा समस्या होत नाहीत.

तिशीनंतरचे आजार

पाचनक्रिया
याकाळात पुरूषांच्या पाचनतंत्रात बिघाड होऊ लागतो. अन्न पचण्यास त्रास होतो. शरीर कॅलरीही कमी बर्न करते. लठ्ठपणा वाढू लागतो. यासाठी रोज व्यायाम करावा. चांगला आहार घ्यावा.

कमकुवत हाडे
वाढत्या वयासोबत हाडेही कमकुवत होऊ लागतात. यासाठी कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीचे सेवन केले पाहिजे. नियमित तपासणी करून घ्यावी.

मुत्रग्रंथी वाढणे
३० वयानंतर पुरूषांमध्ये प्रोटेस्ट वाढू लागतात. यामुळे युरिन करताना वेदना होणे, रात्री जास्त लघवी होणे, असा त्रास सुरू होतो. अशावेळी त्वरीत डॉक्टरांकडे जावे.

कोलेस्टेरॉल
लठ्ठपणामुळे शरीरात कोलेस्टॉल जमा होते. ह्रदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. हाय बीपीचीही समस्या होते.

कमी टेस्टोस्टेरोन
३० वयानंतर पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरोन कमी होऊ लागते. हे सेक्स हार्मोन आहे. यामुळे पुरूषांमध्ये तणावाची स्थिती होते. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु