कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे शारीरिक आणि मानसिक ताण वाढत चालला आहे. यामुळे अनेक आजारदेखील होत असतात. कमी वयातच अनेक आजार जडू लागल्याने काम करण्याची क्षमता झपाट्याने कमी होत आहे. वृद्धपकाळात होणारे अनेक अजार अलिकडे तरूणांमध्येही आढळून येऊ लागले आहेत. यासाठी शारीरीक आणि मानसिक कमजोरी वेळीच दूर करणे, खूप महत्वाचे ठरते. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय उपाय असून त्याबाबत माहिती घेवूयात.

हे उपाय करा

* मुलेठी, नागकेशर, बाभळीच्या शेंगा समान प्रमाणात आणि  खडीसाखर घेवून हे मिश्रण बारीक करा. याचे ५ ग्राम सेवन नियमित करा. एक महिना हा उपाय केल्याने अशक्तपणा दूर होईल.

* १ चमचा मधामध्ये एक चमचा हळद पावडर मिसळून रोज सकाळी उपाशापोटी सेवन करा.

* पुनर्नवाच्या मुळांचा रस दोन ते तीन महिने दूधासोबत नियमित दोन चमचे सेवन केल्याने वृद्धांनाही तारूण्याची जाणीव होते.

* १०० ग्राम कौंच चे बीज आणि १०० ग्राम तालमखाना बारीक करुन चुर्ण तयार करा. नंतर यामध्ये २०० ग्राम खडीसाखर बारीक करुन मिसळा. हे चुर्ण कोमट पाण्यात मिसळून सेवन करा.

* रोज आवळ्याचा मुरब्बा, केळी खाल्ल्याने शक्ती वाढते. केळी खाल्ल्यानंतर दूध प्या.

* असगंधचे चुर्ण आणि बिदारीकंद १००-१०० ग्राम घेऊन त्याचे बारीक चुर्ण बनवा. दुधामध्ये हे अर्धा चमचा चुर्ण टाकून सकाळ संध्याकाळ सेवन करा. अशक्तपणा दूर होतो.

डाळिंबाची साल वाळवून बारीक करा. रोज सकाळ संध्याकाळ हे चूर्ण खा. अशक्तपणाची समस्या दूर होईल.

* रोज रात्री झोपण्या अगोदर लसुनच्या दोन पाकळ्या सेवन करा. आवळ्याच्या चुर्णात खडीसाखर बारीक करुन मिसळा. रात्री झोपताना हे एक चमचा चुर्ण सेवन करा.

* चार-पाच खारीक, दोन-तीन काजू आणि दोन बदाम ३०० ग्राम दूधात उकळून घ्या आणि यामध्ये दोन चमचे खडीसाखर टाकून रोज रात्री झोपताना सेवन करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु