हृदयविकार आणि ‘कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट’मध्ये ‘हा’ फरक, जाणून घ्या ६ कारणे

हृदयविकार आणि ‘कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट’मध्ये ‘हा’ फरक, जाणून घ्या ६ कारणे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सध्या कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टने मृत्यू होण्याचे प्रमाण खुपच वाढले आहे. यापाठीमागे विविध कारणे आहेत. यासर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट होय. चिरतरुण राहण्यासाठी करण्यात येत असलेल्या शस्त्रक्रिया, स्टेरॉइड्सचे सेवन करणे, याचे परिणाम शरीरावर होत असतात. यासाठी दगदगीच्या आयुष्यातून काही क्षण प्रत्येकाने स्वत:साठी काढले पाहिजे.

कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट म्हणजे काय ?
कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट आणि हृदयविकाराचा झटका हे दोन्ही प्रकार वेगवेगळे आहेत. कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टमध्ये रक्ताभिसरण आणि हृदय धडधडण्याची प्रक्रिया बंद होते. हा दीर्घ आजाराचा भाग नाही. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये जास्त धोका असतो. कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट इलेक्ट्रिक कंडक्शनच्या बिघाडामुळे होतो. छातीत दुखणे म्हणजे हृदयविकाराचाच झटका आहे, असे नाही. कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळे सुद्धा छातीत दुखते, हार्टबर्न होते. कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्टमध्ये काही मिनिटाने मृत्यूचा धोका संभावतो.

ही आहेत लक्षणे
* छातीत दुखणे.
* श्वास घेण्यास त्रास होणे.
* छातीत धडधड होणे.
* चक्कर येणे.
* शुद्ध हरपणे.
* थकवा किंवा अंधारी येणे.

उपचार
१ हृदयाचे ठोके सामान्य होण्यासाठी रुग्णाला कार्डियोपल्मोनरी रेसस्टिसेशन (सीपीआर) दिले जाते.
२ डिफायब्रिलेटरद्वारे विजेचा झटका देऊन हृदयाचे ठोके सामान्य करण्याचा प्रयत्न केला जातो.

अशी घ्या काळजी
१ दररोज ध्यानधारणा आणि प्राणायाम करा.
२ स्नायूंना आराम मिळण्यासाठी त्या प्रकारचे व्यायाम करा.
३ व्यायामाच्या आधी, व्यायाम करताना आणि नंतर पाणी जरूर प्या.
४ साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटे चालावे, यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
५ दिनक्रमामध्ये व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. नियमितपणे व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.
६ वजन कमी करण्याच्या नादात अति व्यायाम करू नका.
७ नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी प्या.
८ ताण-तणाव किंवा मानसिक त्रास कमी करा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु