पायांना स्वच्छ आणि सुंदर बनवतात ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

पायांना स्वच्छ आणि सुंदर बनवतात ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पाय स्वच्छ ठेवले तर विविध प्रकारच्या आजारांपासून रक्षण होते, असे म्हटले जाते. पाय आणि टाचा स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज पाय स्वच्छ करण्यासाठी १० मिनिटांचा वेळ काढला पाहिजे. पाय स्वच्छ करण्याचे काही खास घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

* टाचांच्या भेगांमुळे त्रस्त असाल तर त्यावर लिंबू रगडा. त्याचबरोबर कोमट पाण्यामध्ये एक ताजे लिंबू पिळून त्यामध्ये २० मिनिट पाय बुडवून ठेवा. त्यानंतर स्क्रब करून घ्या.

* पायाला जास्त घाम येत असेल तर पाण्यामध्ये व्हिनेगर टाकून पाय बुडवून ठेवावेत. १० मिनिटांनी पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.

* शॅम्पूच्या फेसाने पायाचा टाचा स्वच्छ करू शकता.

* संत्र्याच्या रसामध्ये भरपूर व्हिटॅमिन असते. पाय उन्हामुळे भाजले असतील तर त्यावर संत्र्याचा रस लावा. १५ मिनिटांनी पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

* पाय स्वच्छ करण्यासाठी खडेमीठ वापरावे. या मिठाने हळूहळू पायांना मसाज केल्यास पाय स्वच्छ होतील.

* पाय ओले करून थोडीशी साखर १० मिनिट पायांवर रगडा. त्यानंतर पाय गरम पाण्यामध्ये थोडावेळ बुडवून ठेवा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु