नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय

नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन – शरीरातील सर्व नसांचा संबंध नाभीशी असल्याने नाभीवर काहीही लावल्यास त्याचा थेट प्रभाव शरीर आणि चेहरा यावर पडतो. शरीरातील सर्व अवयवांना पोषण नाभीपासून मिळते. काही खास औषधी पदार्थ नाभीवर लावल्यास त्याचा चांगला परिणाम शरीरावर दिसून येतो. हे पदार्थ कोणते, आणि ते कसे वापरावे, याविषयी माहिती घेवूयात.

हे आहेत उपाय

शुद्ध तूप
नाभीवर तूप लावून मसाज केल्यास त्वचेचा सावळेपणा दूर होऊन त्वचा उजळ होते.

मोहरीचे तेल
मोहरीच्या तेलाचे २ थेंब नाभीवर लावून मसाज केल्यास चेहरा तजेलदार होतो. चेहरा मुलायम होऊन सुरकुत्या जातील. ओठांचा काळेपणा दूर होतो. ओठ फाटत नाहीत.

मध
पिंपल्स असल्यास नाभीवर दोन थेंब मध टाकून मसाज करा. दिवसातून दोन ते तीन वेळेस हा उपाय केल्यास चांगला फरक जाणवतो. पिंपल्स येणार नाहीत.

गुलाबजल
गुलाबजल नाभीवर लावून ठेवा. हे नाभीवर लावल्याने डाग दूर होतील. सुकून गेलेला चेहरा खुलून दिसेल. दिवसात २ ते ३ वेळेस हा उपाय करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु