जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आवळा हा एक उत्तम औषधी पदार्थ आहे. आवळा हा पचायला हलका ही असतो. यामुळे पित्तदोष कमी होतो. उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये आवळा नेहमी उपयुक्त असतो. आवळ्याला त्याच्या सर्व गुणांमुळे अमृताची उपमा दिली आहे. चला जाणून घेऊ अशाच आवळ्याबद्दल आरोग्यास होणारे फायदे.

च्यवनप्राश, ब्राह्मरसायन, आमलकावलेह, धात्री अशा रसायनांमध्ये आवळा हाच मुख्य घटक असतो. आवळा रसायन गुणाचा आणि तारुण्य टिकवून ठेवणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ समजला जात असल्याने अशा रसायनात आवळ्याचा वापर केला जातो.

आवळा चवीला आंबट जरी असला तरी यामुळे वाताचे शमन कमी होते, आणि गोड व थंड असल्याने पित्त कमी करतो तर त्यातील तुरट व रुक्ष गुणामुळे कफाचे त्रास कमी होते.

आवळ्याचा रस दोन चमचे, दोन चिमूट जिरे पूड आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास १५ दिवसांत आम्लपित्ताचा त्रास थांबतो.

आवळ्याचा रस दोन चमचे खडीसाखरेसह घेतल्यास पित्त वाढल्याने चक्कर येत असेल तर त्यावर उपयुक्त आहे. अशा या आवळ्याचा लोणचा ही पचनास उपयोगी होतो.

आवळा, आले किसून त्याला सैंधव व जिरे पूड लावून उन्हात वाळवून तयार केलेली सुपारी भोजनानंतर सेवन केल्यास पचनास मदत करते तसेच पित्तशमना

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु