‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महिला, मुली आपल्या त्वचेला खूप जपतात. आज काल आपल्याला पेडिक्यूर चे अनेक प्रकार माहित आहे. कधी हाताचा तर कधी आपण पायाचा पेडिक्यूर करत असतो. आता पायाच्या पेडिक्यूर साठी फिश पेडिक्यूर सगळ्यांचे आकर्षण झाले आहे. यामध्ये माशांनी भरलेल्या टब मध्ये आपले पाय ठेवले जातात. या लहान लहान माशांमुळे पायांवरची डेड स्किन दूर होण्यास मदत होते. गारा रूफा नावाचे हे मासे पायांवरील डेड स्किन खातात याने आपले पाय मुलायम होते. जाणून घ्या अशाच या पेडिक्यूरचे फायदे आणि नुकसान

फिश पेडिक्यूरचे फायदे :-
फिश पेडिक्यूरमुळे पायांची त्वचा मुलायम होते. राकप्रवाह सुरळीत चालते. फिश पेडिक्यूर केल्यामुळे पायातील दुखणे ही कमी होते. फिश पेडिक्यूर केल्यामुळे  एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या आजारांवर फायदा होतो.

फिश पेडिक्यूरचे नुकसान :-
आपण फिश पेडिक्यूर करताना एका गोष्टी कडे जरूर लक्ष द्या की पेडिक्यूर साठी वापरले जाणारे पाणी प्रत्येक वेळेस बदलले जाते की नाही. जर हे पाणी नाही बदलले गेले तर तुम्हाला पायाच्या त्वचेसंबंधी आजार होण्याची शक्यता असते. नेहमी या गोष्टी कडे लक्ष देणे गरजेचे आहे की पेडिक्यूरसाठी वापरले जाणारे पाणी स्वच्छ असावे.

सावधगिरी :-
मधुमेहाच्या रुग्णांनी चुकूनही फिश पेडिक्यूर करू नये. जर तुमच्या पायाला जखम असल्यास फिश पेडिक्यूर कधीच करू नये. यामुळे जखम वाढण्याची शक्यता असते. फिश पेडिक्यूर करवून घेताना जर अचानक तुमच्या पायातून रक्त येण्यास सुरुवात झाली तर लगेच पाय पाण्यातून काढा आणि त्यावर आधी औषध लावा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु