वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय

वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन – डोकेदुखीचा त्रास झाला नाही, असा मनुष्य सापडणे तसे अवघडच आहे. कारण, ही एक सामान्य समस्या असून ती अनेकांना होत असते. ती होण्याची अनेक कारणे असून यावर पेनकिलर घेणे, बाम लावणे, अशी औषधे काहीजण स्वताच घेत असतात. मात्र, ही समस्या सतत होत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नये. अशावेळी वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. वारंवार डोकेदुखी होण्याची कारणे आपण जाणून घेणार आहोत.

Image result for कमी झोप

१ कमी झोप

अपूर्ण झोपेमुळे कामामध्ये जास्त लक्ष केंद्रित होत नाही. तसेच डोकेदुखी सुरू होते. शांत झोप शरीर आणि मेंदू दोघांनाही पूर्णपणे ताजेतवाने करते.

Image result for केस बांधणे

२ केस बांधणे

केस बांधण्याच्या पद्धतीने किंवा हेअर पिन खूप जास्त घट्ट लावल्यामुळे डोकेदुखीची समस्या होऊ शकते. काी हेअर जेलमुळेही डोकेदुखी होऊ शकते. केस घट्ट बांधू नयेत.

Image result for हार्मोन्स

३ हार्मोन्स

हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने डोकेदुखीची समस्या होऊ शकते. अनेक महिलांना मासिक पाळीच्या सुरुवातीला डोकेदुखीची समस्या होते.

४ स्टेस
तणाव हे डोकेदुखीचे सर्वात मोठे कारण आहे. मायग्रेनच्या समस्येचा जास्त ताण घेतल्यास असे होते. तणावात असल्यास मान आणि खांद्याजावालील नसा ताणल्या जातात, ज्यामुळे डोकं दुखते.

Image result for जास्त राग

५ जास्त राग

रागामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. वारंवार राग येत असल्यास डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु