चेहरा झटपट चमकवणारे ‘हे’ खास ४ घरगुती उपाय, जाणून घ्या

चेहरा झटपट चमकवणारे ‘हे’ खास ४ घरगुती उपाय, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहरा उजळ हवा म्हणून अनेकजण महागड्या क्रीम वापरतात. परंतु, काहीही उपयोग नाही. नैसर्गिक उपचाराने प्राचीन काळी लोक त्वचा उजळ करत असत. विशिष्ठ प्रकारच्या घरगुती उपायांचा अवलंब केल्यास ते सहज शक्य आहे. चेहरा झटपट चमकवणारे असेच काही खास उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे उपाय करा

* काजू दुधात भिजवून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट लावा. त्वचा शुष्क असेल तर काजू रात्रभर दुधात भिजवून ठेवा सकाळी पेस्ट तयार करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मध मिसळून या मिश्रणाने चेहरा स्क्रब करा.

* तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीमध्ये दही आणि पुदिन्याची कोवळ्या पानांची पावडर मिसळून हे मिश्रण अर्धातास ठेवा. अर्धा तासानंतर चेहरा आणि गळ्यावर हे मिश्रण लावा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. या उपायाने तेलकटपणा मुळापासून नष्ट होईल.

* पिंपल्ससाठी मुलतानी मातीचा फेसपॅक उत्तम पर्याय आहे. कारण हा फेसपॅक त्वचेवर जमा होणारे तेल शोषून घेतो आणि त्वचा मुलायम ठवतो.

* अर्धा चमचा संत्र्याचा रस घेऊन त्यामध्ये ४-५ थेंब लिंबाचा रस, अर्धा चमचा मुलतानी माती, अर्धा चमचा चंदन पावडर आणि काही थेब गुलाबपाणी मिसळून हे मिश्रण थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर हे मिश्रण १५-२० मिनिट लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून घ्या. या उपायाने त्वचा लगेच उजळते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु