अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

‘गॅलॅक्टोगॉग्स’ आहे तरी काय ?

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ( डॉ. सौ.गायत्री समीर बोडस ) अंगावरचे दूध वाढवण्यास मदत करणारे पदार्थ यांना वैद्यकीय भाषेत ‘गॅलॅक्टोगॉग्स’ म्हणतात. स्तनपान हे बाळासाठी  सर्वश्रेष्ठ असतं. मात्र बर्‍याचदा महिलांना स्तनपानासाठी पुरेशा प्रमाणात दूध येत नाही. याकरिता काही खाद्यपदार्थांचा समावेश आहारात केला पाहिजे.

१. मेथी
स्तनपान देणार्‍या महिलांनी मेथीचे सेवन केल्यास अंगावरचे दूध वाढण्यास मदत होते. मेथीचे लाडू स्तनपानासाठी उत्तम पदार्थ होय.

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या
२. बडीशेप
बडीशेप मध्ये व्हिटॅमिन बी,पोटॅशियम,फॉसफरस आदी पोषक तत्व असतात ज्यामुळे दूध निर्मिती वाढते. बडीशेपमुळे बुद्धकोष्ट व गॅसच्या त्रासांपासून आराम मिळतो.

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या
३. जीरे
जीर्‍यात भरपूर कॅलशियम आढळतं(१००ग्रॅम जीरे=९३१मिलीग्रॅम कॅलशियम). हे कॅलशियम अंगावरचे दूध वाढवण्यास मदत करते.

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या
४. तीळ
तीळामध्ये कॅलशियम, मँगनीज़, लोह, व्हिटॅमिन बी व तंतूमय पदार्थ आहेत. तीळातील कॅल्शिअम  स्तनपान देणार्‍या महिलेच्या हाडांसाठी तर उत्तम आहेच त्याबरोबर अंगावरचे दूध वाढवण्यास फायदेशीर आहे.

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या
५. डिंक
डिंकाचा उपयोग फार पूर्वीपासून स्तनपान देणार्‍या स्त्रियांसाठी लाडूंच्या स्वरूपात होत आला आहे. प्रसूतीनंतरचा अशक्तपणा दूर करण्यासाठी डिंक उपयुक्त आहे.

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या
६.अळीव
अळीवमध्ये दुग्धनिर्मिती साठी स्तनग्रंथींना प्रवृत्त  करण्याचा विशेष गुणधर्म आहे. यामुळे स्तनपानाच्या काळात अळीवाचे सेवन उपयुक्त ठरते.

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या
७. खारीक
खारीक मध्ये व्हिटॅमिन ए व बी,लोह, इत्यादी गुणकारी तत्व मुबलक प्रमाणात आढळतात. दुग्धनिर्मितीसाठी खारीक स्तनपान देणार्‍या स्त्रियांच्या आहारातला महत्वपूर्ण घटक आहे.

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या
स्तनपानामुळे बाळाला होणारे फायदे –

१.बाळासाठी आईचे दूध हे सर्वगुण संपन्न आहे.
२.आईचे दूधातले जैव-रसायन वेगळे असतात जे बाळाला अधिक सुदृढ बनविते.
३.आईचे दूध बाळासाठी पचायला हलके असते.
४.आईच्या दूधात इम्युनोग्लोबिन A असते जे फॉर्मुला मिल्कमध्ये नसते. हे तत्व बाळाला अनेक रोगांपासून दूर ठेवते व आयुष्यभरासाठी प्रतिकारशक्ती देते.

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या
स्तनपानामुळे आईला होणारे फायदे

१. आॉक्सिटोसिन हार्मोनमुळे प्रेगनन्सीमध्ये वाढलेल्या गर्भाशयाचा आकार कमी होतो.
२. स्तनपान केल्याने वज़न कमी होते.
३. स्तनपान केल्याने स्तनाचा कर्करोग होत नाही.
४. स्तनपान केल्याने मासिक पाळी पुढे जाते म्हणजे लगेच दुसर्‍यांदा गरोदर रहायची भीती नसते.

डॉ. सौ.गायत्री समीर बोडस
B.H.M.S., Certified Nutritionist
Dnyanada Clinic
Shop no.8 ,Kumar Pushkar
840 Sadashiv Peth,Pune-30
Mobile:8983781407

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु