डायबिटीजच्या रुग्णांसाठी कडीपत्ता रामबाण औषध, जाणून घ्या ७ फायदे

डायबिटीजच्या रुग्णांसाठी कडीपत्ता रामबाण औषध, जाणून घ्या ७ फायदे
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भारतात स्वयंपाकासाठी कडीपत्ता मोठ्याप्रमाणात वापरला जातो. विविध पदार्थांची चव या कडीपत्त्यामुळे वाढते. विशेषता महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात कडीपत्ता वापरला जातो. तसेच दक्षिण भारतीय पदार्थ सांबार, रसम यामध्ये या पानांचा जास्त प्रमाणात उपयोग होतो. भाजीमध्ये व डाळीला तडका देण्यासाठी याचा वापर केला जातो. १०० ग्रॅम कडीपत्त्यामध्ये ६६ टक्के मॉइश्चर, ६.१ टक्का प्रोटीन, १ टक्का वसा, १६ टक्के कार्बोहायड्रेट, ६.४ टक्के मिनिरल वॉटर असते, असे संशोधनात आढळून आले आहे. कडीपत्ता विविध आजारात उपयोगी असून त्याचे फायदे जाणून घेवूयात.
डायबिटीज 
कडीपत्त्यामधील अँटी-डायबिटिक एजंट शरीरातील इन्सुलिनला प्रभावित करतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते. यातील फायबर डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर आहे. जेवणात कडीपत्त्याचा वापर वाढवावा. किंवा तीन महिने सकाळी रिकाम्या पोटी कडीपत्ता खाल्ल्यास लाभ होतो. कडीपत्ता लठ्ठपणा कमी करून डायबिटीज दूर करू शकतो.

हृदयरोग 
कडीपत्त्यात ब्लड कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुण असल्याने हृदयाचे आजार दूर राहतात. कडीपत्ता अँटी-ऑक्सीडेंट्सने भरपूर असल्याने कोलेस्ट्रॉलचे ऑक्सीकरण रोखतात. ऑक्सीकृत कोलेस्ट्रॉल हे दुषित कोलेस्ट्रॉल बनवतात ज्यामुळे हृदयाचे आजार होऊ शकतात.

डायरिया 
कडीपत्त्यामध्ये कार्बाजोल एल्कालॉयड्स असतात, यामध्ये अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण आढळून येतात. हे गुण पोटासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे पोटातील पित्त दूर होते, जे डायरिया होण्याचे मुख्य कारण आहे. डायरिया झाल्यास कडीपत्त्याची पाने बारीक करून त्याचा काढा दिवसातून दोन-तीन वेळेस घ्यावा.

कफ 
कोरडा कफ, डोकेदुखी आणि छातीमध्ये कफ असल्यास कडीपत्ता रामबाण उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए सोबतच अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-फंगल एजंट असतात जे कफ बाहेर काढतात. कफ कमी करण्यासाठी एक चमचा कडीपत्ता चूर्ण एक चमचा मधात मिसळून मिश्रण तयार करावे. हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळेस घ्यावे.

लिव्हर
कडीपत्ता लिव्हरला ऑक्सीडेटिव स्ट्रेसपासून वाचवतो. शुद्ध तुप गरम करून त्यामध्ये एक कप कडीपत्ता ज्यूस मिसळावा. यामध्ये थोडी साखर आणि काळे मिरे टाकावेत. हे मिश्रण कमी तापमानावर उकळून घ्यावे. थोडेसे थंड झाल्यानंतर हे मिश्रण प्यावे.

अ‍ॅनिमिया 
कडीपत्त्यामध्ये आयर्न आणि फॉलिक अ‍ॅसिड भरपूर असते. अ‍ॅनिमिया आयर्नची कमतरता आणि शरीरात आयर्न शोषून घेण्याची आणि त्याला उपयोगात आणण्याची शक्ती कमी होते तेव्हा होतो. फॉलिक अ‍ॅसिड आयर्नला शोषून घेण्यास मदत करते. अ‍ॅनिमिया झाल्यास एक पेंडखजूर दोन कडीपत्त्याच्या पानांसोबत दररोज सकाळी रिकाम्या पोटी खावी.

केस 
कडीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी१ बी३ बी९ आणि सी असते. तसेच आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. कडीपत्त्याच्या वापराने केस पांढरे होत नाहीत. रात्रभर भिजत ठेवलेले बदाम पाणी आणि १०-१५ कडीपत्त्याच्या पानांसोबत बारीक करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट डोक्याला लावा. थोड्यावेळाने माइल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास चांगला फरक पडतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु