जीवघेण्या मलेरियाचा इतिहास आणि लक्षणे, जाणून घ्या

जीवघेण्या मलेरियाचा इतिहास आणि लक्षणे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारतात मलेरियाने मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात मलेरियासारख्या आजाराची शक्यता मोठ्या प्रमाणात बळावते. कारण पावसाळ्यात मलेरियाच्या डासांची उत्पत्ती जास्त होते. जाणून घ्या मलेरियाचा इतिहास, त्याची कारणे –

मलेरियाचा इतिहास-

२५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन असतो.
इटालियन शब्द मलेरिया (Mala-दूषित, aria-हवा) म्हणजेच Mal’aria या शब्दापासून Malaria असा शब्द तयार झाला.
क्रिस्टोफर कोलंबस आपल्या आफ्रिकन गुलामांसह अमेरिकेत मलेरिया घेऊन आले आणि त्याचा तेथे झपाट्याने प्रसार झाला.
पुढील तीन शतके जसजसा व्यापार व देशादेशांमधील युद्ध वाढत गेली तसतसा मलेरियाचा प्रसार जगभर झाला.
इ. स. १७४० मध्ये या विशिष्ट ज्वराला मलेरिया हे नाव इंग्लिश लेखक होरेस वाम्पोत्र यांनी दिले. इ.स. १७४३ मध्ये जॅक्वीयर व इ.स. १७५० मध्ये टॉर्टी यांच्या ग्रंथात मलेरिया या संज्ञेचा उल्लेख आहे.

कसा होतो मलेरिया ?
मलेरिया हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होत असून तो ‘अ‍ॅनाफिलीस’ जातीचा डास चावल्याने होतो. मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश करून पोटात जातात व आपली संख्या वाढवितात. त्यानंतर तांबड्या रक्त पेशींमध्ये ते स्वतःहून मिसळतात. मलेरियाचा प्रादुर्भाव होतो.

मलेरियाची लक्षणे –
ताप हे मलेरियाचे प्रमुख लक्षणं आहे.
थंडी वाजून ताप येणे
थंडी-तापासोबत जर तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो.
ताप उतरल्यानंतर घाम सुटणे
ब्लड शुगरचे प्रमाण कमी होणे
पोटाच्या समस्या आणि उलट्या होणे
शुद्धीत नसणे, रक्त कमी होणे, अ‍ॅनीमिया, मसल्स पेन.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु