निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यातील आयुर्वेदिक उपाय,जाणून घ्या 

निरोगी राहण्यासाठी पावसाळ्यातील आयुर्वेदिक उपाय,जाणून घ्या 
आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  कडक उन्हामुळे त्रस्त झालेले सर्वजण पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पहात असतात. पावसाळा सुरू झाला की सारा आसमंत अल्हाददायक होऊन जातो. वातावरणात गारवा वाढतोआणि हायसे वाटते. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद तर काही वेगळाच. वयाचे भान विसरून अनेकजण पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद घेतात.

अशा या पावसाळ्यात वातावरणात अचानक बदल होत असल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्तीदेखील कमी होत असते. तर दुसरीकडे विविध आजारसुद्धा पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण या काळात आजारी पडतात. पावसाळ्यात शरिरातील अम्लाचे प्रमाण वाढते. यामुळे कफ होतो, पित्त वाढते. हा त्रास होऊ नये म्हणून आयुर्वेदिक नियमांचे पालन केले पाहिजे.

 पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी ही खबरदारी घ्या

* स्वयंपाक तयार करताना जड तेल वापरू नये. तुपाचा वापर करावा. शेंगदाना तेल, मोहरीचे तेल, लोणी वापरू नये.

* आठवड्यातून दोन वेळा तरी तेल मालिश करा. यासाठी तिळाचे तेल वापरावे.

* तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. चटणी , लोणचं , दही यांसारखे पदार्थ टाळावेत.

* हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. मूग डाळ, खिचडी, मका यांसारखे पदार्थ खावेत.

* धावणे, सायकलिंग यासारखे कष्टाचे व्यायम करू नये. यामुळे शरिरातील उष्णात वाढते. याला पर्याय म्हणून वॉकिंग, स्विमिंग करावे.

* पावसाळ्यात आहारात जंक फुडचा समावेश केल्यास तुम्ही आजारी पडू शकता. या काळात शरिराची पचनक्रिया मंद होते. जंक फूडचे पचन होण्यास वेळ
लागतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु