महिलांनो, आरोग्यासाठी चांगल्या पॅकेज्ड फूड्सची निवड अशी करा

महिलांनो, आरोग्यासाठी चांगल्या पॅकेज्ड फूड्सची निवड अशी करा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शहरातील महिला पॅकेज्ड फूडचा वापर स्वयंपाक घरात जास्तीत जास्त करतात. पॅकेज्ड फूडमुळे स्वयंपाक करण्याच्या वेळेत बचत होते. सुविधाजनक, स्वच्छ आणि विश्वसनीय अशा पॅकेज्ड फूड्समुळे महिलांना स्वयंपाकघरातील व्यवस्थापन, फॅमिली मेन्यू आणि वीकेंडचे प्लॅनिंग करणे सोपे जाते. परंतु, सर्वोत्तम पॅकेज्ड फूड्स कसे निवडावे, हा मोठा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न महिलांसमोर असतो. यासाठी योग्य पर्याय कसा निवडावा हे आहारतज्ज्ञांनी सांगितले आहे.

महिलांनी यास प्राधान्य दिल्यास पॅकेज्ड फूड्स निवडण्यात त्यांना नक्कीच मदत होऊ शकते.
नेहमी पॉलिश नसलेले धान्य, डाळी खरेदी कराव्यात. पीठ १०० टक्के होलग्रेनचे असावे. तर पास्त्यामध्ये होलव्हीट अधिक असावे. मधुमेह असेल तर होलफूड्स डायबिटिक आटा, बेसिक आयुर्वेदिक करेला जामून पावडर, होलफूड्स शुगर फ्री आवला आणि आल्मंड्स रॉक्स, मिंट सफोला डायबिटिक पिठामध्ये ब्लिस शुगरफ्री डार्क चॉकलेट्स हे खावू शकता. अथवा अशा उत्पादनांची निवड करू शकता.
नेहमी वेगवेगळ्या ब्रँडचे ब्राऊन राइस खरेदी करावेत.

कारण प्रत्येकामध्ये न्यूट्रिएन्सचे प्रमाण वेगवेगळे असते. फायबर भरपूर प्रमाणात असल्याने हे तांदूळ उशिरा शिजतात. मात्र, त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. टेट्रापॅकमधील दूध खराब होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे तेच वापरावे. ते अत्यंत सुरक्षित असते आणि पुन्हा गरम करण्याचीही गरज नसते. हे लक्षात ठेवा की, नट्स, फ्रुट्स, भाज्या, मासे आणि मांस नैसर्गिक रूपात म्हणजेच अनपॅक्ड खाण्यास प्राधान्य द्यावे. पॅकेज्ड असेल तर त्यात सिंथेटिक अ‍ॅडिटिव्हज नाहीत ना, याची खात्री करून घ्या. तसेच पॅकेज्ड थंडपेयांमध्ये अतिरिक्त साखर असते. त्यामुळे फळांचा ताजा रस किंवा फळे खाणे अधिक चांगले असते.

नाष्ट्यामध्ये इमल्सीफायर नसणारे रेडी टू ईट ओट्सची खरेदी करावी. पॅकेज्ड ब्रेकफास्टमध्ये साखर आणि सिंथेटिक प्रिझव्र्हेटिव्ह नाहीत ना, हे तपासून घ्यावे. शक्यतो प्रोसेस्ड मीट, सॉसेस अशी उत्पादने खरेदी करू नयेत. यात प्रिझव्र्हेटिव्हचे प्रमाण अधिक असते. मांस निकृष्ट दर्जाचे असू शकते. त्याऐवजी ताजे मासे आणि मांस यांना प्राधान्य द्यावे. नेहमी कोणतेही उत्पादन खरेदी करताना त्यावरील लेबल काळजीपूर्वक वाचावे.

पिक मी नॉट लेबल असेल तर त्या उत्पादनात ट्रान्स फॅट आहे असा अर्थ होतो. नो ट्रान्स फॅट लेबलमुळे संभ्रम निर्माण होतो. झीरो ट्रान्स फॅट लिहिलेले असेल, तर त्याची सत्यता पडताळून पहावी. हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल आणि अधिक फ्रॅक्टोज असणारे कॉर्न सायरप कधीही खरेदी करू नका. ज्या बिस्कीट आणि कुकीजच्या लेबलवर हेल्दी असे लिहिलेले असेल ते कमी खावे. अशा उत्पादनांमध्ये ओट्स, नाचणी किंवा मल्टिग्रेनचे प्रमाण कमी आणि कॅलरी अधिक असतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु