महिलांनो, मैत्रिणाचा ‘डाएट फॉलो’ करण्यापूर्वी ‘हे’ जरूर वाचा, ‘ही’ आहेत ५ कारणे

महिलांनो, मैत्रिणाचा ‘डाएट फॉलो’ करण्यापूर्वी ‘हे’ जरूर वाचा, ‘ही’ आहेत ५ कारणे

आरोग्यानामा ऑनलाईन टीम : एखाद्या मैत्रिणीने वजन खुपच कमी केल्याने ती स्लीम दिसत असल्यास अनेक महिला लगेच तिला कारण विचारतात. मग ती मैत्रिण आपण कोणते, औषध घेतले अथवा कोणता डाएट घेतो, याचे रसभरीत वर्णन करते. हे ऐकुन महिलांना तिचा डाएट फॉलो करण्याची इच्छा होते. कधी-कधी एखाद्या अभिनेत्रीचा डाएट फॉलो करण्याचीही महिलांना इच्छा होते. परंतु, हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. म्हणून अन्य कुणाचे ऐकुन शरीरावर कोणतेही प्रयोग करू नका.

ही आहेत कारणे
१ प्रत्येक जण एकमेवाद्वितीय असतो. प्रत्येकाची शरीराची बांधणी, एकूण जडणघडण, बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची कुवत वेगवेगळी असते.

२ प्रत्येक शरीराची पचनशक्ती वेगळी असते आणि हेच अन्न अतिरिक्त झाले तर कुठे साठवायचे ते स्नायूंच्या मेटाबोलिझमवर अवलंबून असते.

३ सेलिब्रिटी जो आहार घेतात, त्याच प्रमाणात ते वर्कआऊट करतात. तुम्ही वर्कआऊट न करता त्यांचा डाएट घेतल्यास त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात.

४ फक्त फळांचा रस पिणे किंवा दिवसभर न जेवता बाहेर फक्त पिझ्झा किंवा बर्गर खाल्ल्याने विटॅमिन्सची कमतरता निर्माण होते. यामुळे चिडचिड, डोकेदुखी, पाळीचे त्रास, केस गळणे चालू होते.

५ चुकीच्या आहारामुळे अ‍ॅसिडीटी, मूड स्विंग, इन्सुलीन व हार्मोनचा नियंत्रण बिघडणे, आदी त्रास होतात.

हे लक्षात ठेवा
* यकृत आणि स्वादुपिंडाच्या आजूबाजूची फॅट कमी केली तर मधुमेहावर नक्कीच मात करता येते.

* बीसीए नावाची चाचणी केली तर स्वतःच्या शरीराला नीट समजून त्याची आतली जडणघडण कळून येते.

* कुठलीही आहारपद्धती स्वीकारण्याऐवजी, तिचा आपल्यावर चांगला परिणाम होईल का, याचा सारासार विचार करा.

* एखाद्यासाठी जे औषध असेल ते अन्य व्यक्तीसाठी विषही ठरू शकते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु